Nashik Dam Agrowon
शासन निर्णय

Nashik Water : नाशिक जिल्ह्यातील दोन जलसंपदा प्रकल्प मार्गा ; कळमुस्ते आणि चिमणपाडा या प्रवाही योजनांना मान्यता

Cabinet Decision : नाशिक जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते आणि दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा या प्रवाही योजनांना मंजुरीचा देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक आणि मराठवाड्यातील लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

Team Agrowon

Water Irrigation Project : नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते आणि दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा या प्रवाही योजनांना गती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. पण मागील वर्षभरात ब्रेक लागलेल्या या योजनांना  शिंदे-फडणवीस-पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट काही प्रमाणात भरून निघणार आहे.

गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जावू देता त्याचा फायदा राज्यातील लोकांना व्हावा, यासाठी मंत्री छगन भुजबळ त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते आणि दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा या प्रवाही योजनांसाठीआग्रही होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यासाठी गती देण्याच्या हालचाली झाली होत्या. पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर या योजनेला ब्रेक लागला होता.


 शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यानंतर झालेल्या पहिल्याच शासकीय बैठकीत दिंडोरी, त्र्यंबक तालुक्यातील वळण योजनेस मान्यता देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातगील त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते कळमुस्ते योजनेमुळे गोदावरी खोऱ्यातील पाणीसाठा १३.६८ किमीच्या बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने वळविण्यात येईल. या योजनांसाठी ४९४ कोटी ९८ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. तर दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा योजनेत पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून, प्रवाही वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येईल. यामुळे  करंजवण धरणातील १११ हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होईल. या प्रकल्पासाठी ३६ कोटी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT