Pune News: राज्य शासनाने आज (ता.१७) केंद्राच्या ‘आत्मनिर्भरता कृषी तंत्रज्ञान व प्रशिक्षण अभियान’ (आत्मा) योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षातील दुसऱ्या हप्त्यासाठी एकूण ३५ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २७ कोटी, अनुसूचित जातींसाठी ४.८७ कोटी आणि अनुसूचित जमातींसाठी ३.८५ कोटी असे वाटप करण्यात येणार आहे. या निधीमुळे राज्यातील कृषी विस्तार यंत्रणा बळकट होऊन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार असल्याचे शासनाने म्हटले आहे. .आत्मा योजना काय आहे ?‘आत्मा’ (ATMA) म्हणजे जिल्हा स्तरावर चालणारी कृषी विस्तार सुधारणा योजना असून तिचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवणे हा आहे. या योजनेखाली शेतकरी प्रशिक्षण, शिबिरे, कृषी मेळावे, नवीन पिकांवरील प्रयोग आणि महिला शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम राबवले जातात. विविध कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी गटांचा समन्वय साधून ही योजना जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत अमलात आणली जाते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व तंत्रज्ञान सहज उपलब्ध होते..ATMA Scheme : जिल्हाधिकारी ‘आत्मा’वर नाराज.या योजनेसाठीचा निधी केंद्र आणि राज्य शासनाच्या ६०:४० या प्रमाणात विभागला गेला आहे. त्यानुसार केंद्राचा हिस्सा २१ कोटी ४७ लाख रुपयांचा तर राज्याचा हिस्सा १४ कोटी ३१ लाख रुपयांचा असे एकत्रित ३५ कोटी ७९ लाख उपलब्ध करून देण्यात येणार आहे..ATMA Employees : राज्याच्या वित्त विभागाला ‘आत्मा’ कर्मचाऱ्यांचे साकडे .या निधीचे वाटप खालीलप्रमाणे असणार आहे:सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी - २७ कोटी ०५ लाख ६६ हजार रुपयेअनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी - ४ कोटी ८७ लाख ९६ हजार ९०० रुपयेअनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी - ३ कोटी ८५ लाख ९९ हजार ९१७ रुपये.शेतकऱ्यांसाठी हे फायदे…या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतकरी गटांना मजबूत करणे, महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, मातीची तपासणी अशा गोष्टींवर काम करता येईल. विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधी असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होणार आहे असे शासन म्हणते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.