KCR Maharashtra visit : 'केसीआर' याची आज महाराष्ट्रात ग्रँड एंट्री! ३०० गाड्यांचा ताफ्यासह अख्खं मंत्रिमंडळ सोलापूराच्या दिशेने रवाना

BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ३०० गाड्यांच्या ताफ्यासह अख्खे मंत्रिमंडळ आज सोलापूरात दाखल होणार आहे.
kcr Maharashta
kcr Maharashtaagrowon
Published on
Updated on

Telangana Chief Minister : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांना आपल्या भारत राष्ट्र समितीचा (BRS)महाराष्ट्रात विस्तार करायचा आहे. या पार्श्वभूमीवर केसीआर दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत ३०० गाड्यांच्या ताफ्यासह आख्खं मंत्रिमंडळ आणि सर्व आमदार आज सोलापूरात दाखल होणार आहे.

kcr Maharashta
Ashadhi Wari 2023 : ३०० गाड्यांच्या ताफ्यासह तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ पंढरपुरात येणार ; केसीआर करणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी लोकसभा निवडणूक २०२४ डोळ्यासमोर आपल्या पक्षाच्या देशभर विस्तार करण्याचा आहे.  त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात विशेष लक्ष्य दिले असून मागील काही महिन्यांपासून त्यांचे महाराष्ट्रात दौरे वाढत आहेत. अब की बार किसान सरकार असा नारा देत त्यांच्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूरमध्ये जाहीर घेतल्या. यावेळी महाराष्ट्रातील अनेक माजी आमदारांनी बीआरएसमध्ये प्रवेशही केला.

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरात दाखल होत असल्याने त्यात केसीआर यांनी बीआरएसला महाराष्ट्रभर पोहोचवण्याची संधी शोधली आहे. दोन दिवस ते सोलापूर आणि पंढरपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यासाठी महिन्याभरापूर्वीच सोलापूर आणि परिसरातील अनेक हाॅटेल बुक करण्यात आली होती.

kcr Maharashta
Rice Mills : तेलंगणा सरकार राईस मिलसाठी २ हजार कोटींची गुंतवणूक करणार


केसीआर  आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळातील मंत्री, सर्व आमदार आणि खासदारांसह सोलापूरच्या दिशेने बसने रवाना झाले आहेत. ३०० गाड्यांचा ताफा सायंकाळी ६ वाजता सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर मंगळवारी ते मंत्रिमंडळासह पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. पंढरीत ते संत ज्ञानेश्वर माऊल आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार आहेत. पण अद्याप त्यांना परवानगी मिळाली नाही.

पंढरपूरानंतर त्यांची सरकोली येथे जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कै. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता  ते तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेचार वाजता ते तुळजापूरहून हैदराबादला रवाना होणार आहे. बीआरएसच्या पक्ष बांधणीसाठी करत असलेल्या केसीआर यांच्या पंढरपूरातील शक्तिप्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com