Horticulture Subsidy | Schemes of NHB Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Horticulture Scheme : जुन्या फळबाग पुनरुज्जीवनासाठी योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ अंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आदींसाठी महाडीबीटी या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज मागविण्यात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

धुळे ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ (Integrated Horticulture Development Program) अंतर्गत क्षेत्र विस्तार कार्यक्रम फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आदींसाठी महाडीबीटी (MahaDBT) या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन समाविष्ट आहे. विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता

वाढविणे या दृष्टीने प्रयत्न आहेत. या घटकांचे अनुदान असे ः घटक- फळे लागवड, कट फ्लॉवर्स, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर, घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर, कंदवर्गीय फुले, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर.

घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- दीड लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार पाचशे प्रतिहेक्टर, घटक- सुटी

फुले, अल्पभूधारक शेतकरी, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर, घटक- इतर शेतकरी, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर, घटक- मसाला पीकलागवड, बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिके, खर्चमर्यादा- ३० हजार प्रतिहेक्टर,

अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के रक्कम १२ हजार प्रतिहेक्टर, घटक- विदेश फळपीक लागवड, ड्रॅगन फ्रूट, अंजीर व किवी, खर्चमर्यादा- चार लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार प्रतिहेक्टर, घटक- पॅशनफ्रूट, ब्लुबेरी, तेंदुफळ व ॲव्हॅकॅडो, खर्चमर्यादा- एक लाख प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर, घटक- जन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, खर्चमर्यादा- ४० हजार प्रतिहेक्टर, अनुदान मर्यादा- खर्चाच्या ५० टक्के कमाल २० हजार प्रतिहेक्टर.

योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी https://mahadbtmahait.gov.in/farmer/login संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

अहवाल सादर करावा

सातबारा उतारा, ८- अ, आधारकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड संलग्न बँक पासबुकची झेरॉक्स, संवर्ग (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती) प्रमाणपत्र झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा सद्यःस्थितीचा फोटो, हमीपत्र, स्थळपाहणी अहवाल सादर करावा. शेतकऱ्यांना संपर्काचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT