Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टिग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केलेली असली, तरी ती प्रत्यक्षात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या योजनांची गोळाबेरीज आहे. ती वजा करता या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या वाट्याला नव्याने केवळ तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम येण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांना पंजाब आणि तमिळनाडूपेक्षा अधिक मदत दिल्याचा दावा करण्यासाठी पॅकेजची रक्कम फुगविण्याचा आटापिटा करण्यात आला आहे..राज्य सरकारने पॅकेज घोषित करताना एनडीआरएफमधून नुकसानीपोटी मिळणारी जवळपास साडेसहा हजार कोटी रुपये, इतर योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आधीच तरतूद केलेले १० हजार कोटी रुपये, पीकविम्याचे (संभाव्य) ५ हजार कोटी रुपये आणि पीक व पशुधन नुकसानीपोटी एनडीआरएफच्या निकषापेक्षा राज्य सरकारने अधिकचे देऊ केलेले १० हजार कोटी रुपये अशी गोळाबेरीज करून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचा आकडा जुळवला आहे..Farmer Relief Package: पॅकेजच्या नावाखाली भोपळा.वास्तविक पीक, पशुधन व जमिनीचे नुकसान आणि जीवितहानी यासाठी एनडीआरएफमधून मदत मिळतेच. तसेच पीकविमा ही स्वतंत्र योजना आहे. त्यामुळे एनडीआरएफची मदत आणि पीकविमा राज्याच्या पॅकेजचा भाग म्हणून दाखवणे ही हातचलाखी आहे. राज्याने पॅकेज जाहीर केले नसते तरी या दोन्ही माध्यमांतून ठरलेल्या निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणारच होती. परंतु केवळ आकडा फुगवून सांगण्यासाठी ही गोळाबेरीज करण्यात आली..शेतकऱ्यांच्या पदरात वाढीव काय पडले ?शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजारांची अतिरिक्त मदत देण्यासाठी ६५०० कोटी रुपये दिल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. गेल्या वर्षी कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मिळाले होते. यंदा १८ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. म्हणजे कोरडवाहू पिकांसाठी वाढीव ४४०० रुपये मिळतील. परंतु बागायती पिकांसाठी गेल्या वर्षीइतकीच म्हणजे हेक्टरी २७ हजार रुपये मिळणार आहेत. त्यात कोणतीही वाढ केलेली नाही. तर फळपिकांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५०० रुपये कमी मिळणार आहेत. कारण गेल्या वर्षी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत मिळाली, ती यंदा ३२ हजार ५०० रुपये केली आहे..Maharashtra Farmer Relief : दुष्काळाच्या सवलती अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांनाही लागू; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा.म्हणजे सरकारला केवळ कोरडवाहू पिकांसाठी जादाची तरतूद करावी लागणार आहे. त्याची एकूण रक्कम ३ हजार कोटींपेक्षा अधिक असणार नाही, असा अंदाज आहे. सरकारने मदतीची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टर केली. पण राज्यात सुमारे ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक म्हणजेच २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले आहेत. तसेच पशुधन मदतीच्या मर्यादेसाठी ३ ची अट काढली. पण अशा शेतकऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे घोषणा केलेली असली तरी वाढीव मदतीसाठी प्रत्यक्षात १० हजार कोटी रुपये खर्च करावा लागणार नाही, याची काळजी सरकारने घेतलेली दिसते..पीकविम्यावरून दिशाभूलपीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांना किमान हेक्टरी १७ हजार रुपये मिळतील, १०० टक्के नुकसान झाल्यास कोरडवाहू पिकांसाठी ३५ हजार आणि बागायती पिकांसाठी ५० हजारही मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी गेल्या वर्षीपर्यंत राबविलेली विमा योजना चांगली नव्हती, त्यामुळेच योजनेत बदल केला असे सांगितले. पण प्रत्यक्षात सुधारित विमा योजनेचे निकष पाहिले तर शेतकऱ्यांना यंदा एवढी मदत मिळणे अशक्य आहे..पशुधन मदतीतही गोलमालअतिवृष्टी, पुरामुळे पशुधन दगावल्यानंतर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे ३ मोठ्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना मदत मिळते. राज्य सरकारने ती मदत वाढवून दुप्पट करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. पण सरकारने केवळ ३ जनावरांची अट काढली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. कारण दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपये प्रति जनावर मदत मिळणार आहे. ही मदत किमान ७५ हजार करावी अशी मागणी होती. तसेच बैल दगावल्यापोटी ३२ हजार रुपये मिळणार आहेत. ती मदत ६५ हजार करावी, अशी मागणी होती. वाढीव मदतीची मागणी सरकारने फेटाळून लावली आहे. आज ३७ हजार ५०० रुपयांत म्हैस आणि ३२ हजारांत बैल सरकारनेच घेऊन द्यावा, अशी तिखट प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत..सरसकट मदतीवर प्रश्नचिन्ह : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सरकट मदत देणार असून, त्यासाठी ६५ मिलिमीटर म्हणजेच अतिवृष्टीची अट काढल्याचे सांगितले. परंतु सरकारने एनडीआरएफची किमान ३३ टक्के नुकसानीची अट काढणे गरजेचे होते. ती अट कायम आहे. सध्या स्थानिक पातळीवर पंचनामे करून ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान असलेल्या शेतकऱ्यांचीच यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सांगत असले, तरी नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळणार नाही..शेतकऱ्यांना नव्याने काय मिळाले?पिकांचा प्रकार यंदाची मदत (रु. हेक्टरी) गेल्या वर्षीची मदत(रु. हेक्टरी) वाढ / घटकोरडवाहू पिके १८,५०० १३,६०० ४४०० वाढबागायती पिके २७,००० २७,००० शून्यफळपिके ३६,००० ३२.५०० ३५०० घट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.