Sangli News: गेल्या महिन्यात देशभर पाऊस झाला. याचा परिणाम बेदाण्याच्या बाजारपेठेवर झाला असून मागणी आणि उठावही कमी होता. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. दरम्यान, शून्य (झीरो) पेमेंटसाठी चार ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अखेर या कालावधीत बेदाणे सौदे बंद करण्यात आले आहेत. ६ नोव्हेंबरपासून पुन्हा सौदे सुरू होणार आहेत. गेल्या महिनाभरात बेदाण्याचे दर टिकून होते, अशी माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली..गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. मुळात, दसरा तसेच दिवाळी सणासाठी देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी असते. बेदाण्याचा उठावही चांगला होता, दरही चांगले मिळतात. मात्र देशभरात पाऊस सुरू होता. या पावसाचा फटका बेदाणा मागणीवर झाला. परिणामी उठावही कमी झाला. मात्र दर टिकून राहिले. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..Grape management: बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे निर्मिती.सद्यःस्थितीला राज्यात अंदाजे ३० हजार टन इतका बेदाणा शिल्लक आहे. हा बेदाणा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत पुरेल असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र पावसामुळे द्राक्ष फळ छाटण्या लांबणीवर पडल्या आहेत. परिणामी, यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम कधी सुरू होईल, याबाबतचा अंदाज आताच सांगणे मुश्कील असल्याचे बेदाणा शेडमालकांनी सांगितले आहे..बेदाण्याची वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होते. बेदाणा बाजारपेठेतील व्यापारी आणि शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण होईपर्यंत सांगली-तासगाव बेाणा असोसिएशनने एक महिना बेदाणा सौदे झीरो पेमेंटसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर वर्षी दिवाळीपूर्वी बाजार समितीत आवारातील बेदाणा बाजारपेठेतील अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिलाचे व्यवहार पूर्ण केले जातात. त्यानंतर बाजार समितीत प्रशासन आणि सर्व व्यापाऱ्यांची बैठक होते, त्यामध्ये झीरो पेमेंटबाबत चर्चा करून सौदे कधी सुरू करायचे याबाबत निश्चित केले जाते. त्यानुसार ६ नोव्हेंबरपासून सौदे सुरू होतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले..Grape management: बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे निर्मिती.सौदे बंद होण्यापूर्वीबेदाण्याचे दर (प्रति किलो)हिरवा बेदाणा ३०० ते ३८०पिवळा बेदाणा २७० ते ३५०काळा बेदाणा १०० ते १६०.गेल्या महिनाभरात बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. परंतु देशभरात पाऊस असल्याने मागणी कमी झाली आहे. अशा परिस्थितीतही शून्य पेमेंटसाठी सौदे बंद होण्यापर्यंत दर स्थिर होते.सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.