Jalgaon News: खानदेशातील कापूस प्रक्रिया उद्योग अर्थात जिनिंग प्रेसिंग कारखाने यंदा दिवाळीनंतर सुरू होतील. सध्या कापसाची आवक कमी आहे. मजूर मंडळीदेखील सणासुदीनंतर कामाला दाखल होईल. यंदा मात्र हंगामाच्या तुलनेत कापूस गाठींचे उत्पादन (एक गाठ १७० किलो रुई) काहीसे कमी येईल, असेही दिसत आहे. .खानदेशात सुमारे १५२ जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. यात कमाल कारखाने जळगाव जिल्ह्यात आहेत. यात जळगावातील धरणगाव, पारोळा भागांत हे कारखाने अधिक आहेत. या भागातील आघाडीचे काही कारखाने सुरू आहेत. पण हे कारखानेदेखील पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत..Cotton Ginning Factory: जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा.कापूस आवक अल्पसध्या खानदेशात कापूस आवक अल्प आहे. एका कारखान्यास रोज किमान ८५ ते ९५ क्विंटल कापसाची गरज असते. पाच क्विंटल कापसापासून एक कापूसगाठ (एक गाठ १७० किलो रुई) तयार केली जाते. काही कारखान्यांत यापेक्षा अधिकचा कापूस लागतो. पण कापूस आवक कमी आहे. यात जामनेर, चाळीसगाव, भडगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार या कापूस पट्ट्यात कापूस लागवड घटली आहे. खानदेशात यंदा कापसाची लागवड सुमारे एक लाख हेक्टरने कमी झाली आहे. एकूण लागवड साडेसात लाख हेक्टरवर आहे..सध्या पूर्वहंगामी कापूस पिकातून कापूस उपलब्ध होत आहे. या कापूस पिकासही पावसाचा फटका बसला. कापूस वेचणी रखडत सुरू आहे. कापूस वेचणीस दिवाळीनंतर वेग येईल. पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड खानदेशात सुमारे दोन लाख हेक्टरवर असून, या पिकातही रोगराई, पावसाने उत्पादन घटत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनाही फटका बसत असून, कापूस पुरवठ्याचे गणितही बिघडले आहे..Financial Fraud: जिनिंग व्यावसायिकाचा ५१ लाख रुपयांच्या चुकाऱ्यास नकार .खानदेशात यंदा १२२ ते १२३ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू होण्याचा अंदाजकारखान्यांकडून खेडा खरेदीला अजूनही नाही सुरवातकारखानदारांकडून मजुरांची जुळवाजुळवपान २रुईच्या उत्पादनासही फटका बसणार.कापूस उत्पादन जसे घटत आहे. तसे खानदेशात कापूसगाठी किंवा रुईचे उत्पादनही कमी होत आहे. खानदेशात दर वर्षी २४ ते २५ लाख कापूसगाठींचे उत्पादन घेतले जात होते. पण अलीकडच्या तीन-चार वर्षांत कापूसगाठींचे उत्पादन २० ते २२ लाख गाठी एवढेच राहत आहे. यंदा कमी लागवड व कमी उत्पादन यामुळे कापूसगाठींचे उत्पादनही कमीच राहील, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.