Padsale Irrigation Project Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Padsale Irrigation Project : जळगाव जिल्ह्यातील पाडळसे प्रकल्प सरकारी अनास्थेचा बळी

पाडळसे प्रकल्पामुळे प्रत्यक्षात अमळनेर तालुक्यातील २५ टक्केच शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर असून, प्रकल्पामुळे २२ हजार हेक्टर ओलिताखाली येणार आहे.

Team Agrowon

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर तालुक्यातील तापी नदीवरील (Tapi River) पाडळसे सिंचन प्रकल्पाची (Padalse Irrigation Project) सुरुवातीची किंमत अवघी १४२ कोटी होती. यानंतर सप्टेंबर २००९ मध्ये ११२७ कोटींच्या प्रकल्प खर्चाला मान्यता देण्यात आली.

त्यानंतर प्रकल्प खर्चाला मान्यताच मिळाली नसून आठवडाभरापूर्वीच ‘मेरी’कडे सुधारित ४ हजार ८९० कोटींचा चतुर्थ प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तापी पाटबंधारे विकास महामंडळ, (Dam Development Corporation) जळगाव कार्यालयाने सादर केला आहे.

प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून तापी महामंडळासह आमदार व खासदारांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रकल्प खर्चाला २००९ पासून मान्यताच नाही. यात शासनाचा हलगर्जीपणा होता, तापी विकास महामंडळासह आमदार व खासदारांचे दुर्लक्ष होते.

मान्यता मागितलीच नाही की दिलीच नाही, हा संशोधनाचा विषय आहे. १४ वर्षांपासून प्रकल्पासाठीच्या प्रस्तावित खर्चापेक्षा कमी निधी मिळत आहे.

बांधकाम साहित्याच्या किमतींसह प्रत्येक गोष्टींच्या दरवाढीमुळे खर्च वाढला आहे. हा वाढीव खर्च आणि जुनी खर्च मान्यता यामुळे निधी तोकडा मिळत असेल, असे मानल्यास जबाबदार सर्वच घटकांनी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून सर्वसमावेश प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पंचवीस टक्के क्षेत्राचाच कायापालट

पाडळसे प्रकल्पामुळे प्रत्यक्षात अमळनेर तालुक्यातील २५ टक्के शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर असून, प्रकल्पामुळे २२ हजार हेक्टर ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे इतर लहानसहान सिंचन प्रकल्पांसाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT