Water Scheme
Water SchemeAgrowon

Water Scheme : पाणी योजनेचा २५०० हेक्टरला फायदा

कोरेगाव तालुक्यातील पाच आणि कऱ्हाड उत्तरमधील ११ गावांतील अडीच हजार हेक्टरला फायदा होईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कऱ्हाड ः ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांची सर्व गावांना पाणी (Water) मिळाले पाहिजे, अशी भूमिका होती. धनगरवाडी-हणबरवाडी योजनेसाठी (Water Scheme) आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करत आहोत. त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे.

त्यातून कोरेगाव तालुक्यातील पाच आणि कऱ्हाड उत्तरमधील ११ गावांतील अडीच हजार हेक्टरला फायदा होईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Mla Balasaheb Patil) यांनी दिली.

रिसवड (ता. कऱ्हाड) येथील कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘‘१९८५ मध्ये शिवाजीराव देशमुख सह्याद्री कारखान्यावर आल्यावर त्यांना धोमचा कालव्याचे पाणी शामगावच्या तळ्यात सोडून तेथून सर्व गावांना पाणी देण्याची संकल्पना होती. धोम डाव्या कालव्याची उंची कमी करण्यात आल्यामुळे तो आर्वीपर्यंत आला."

"आरफळ कॅनॉलचे काम काही शेतकऱ्यांनी वाठार किरोली परिसरात अडवले. ज्येष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांनी न्यायालयातून त्यावर मार्ग काढला. १९९९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर मी आमदार झालो."

"त्या दरम्यान मंत्री अजित पवार, रामराजे निंबाळकर, अजित घोरपडे यांच्या हस्ते निगडीच्या माळावर पाणी सोडण्याचा कार्यक्रम घेतला. त्या वेळी पी. डी. पाटील यांची सर्व गावांना पाणी मिळाले पाहिजे, अशी इच्छा होती."

Water Scheme
Water Bunds : दौंडच्या पूर्व भागात सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी

त्यानुसार धनगरवाडी-हणबरवाडी योजनेसाठी प्रशासकीय मान्यता १५ मे २००० रोजी मिळाली. त्यानंतर काही कारणाने कामाला विलंब झाला. मात्र काही विरोधकांनी लवकर पाणी काढण्यासाठी मूळ आराखड्यात बदल करून त्याची उंची कमी केल्याने ८५० हेक्टरला फटका बसला.’’

‘‘सातत्याने आम्ही या कामी पाठपुरावा केला. त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. आम्ही योजना पूर्ण केली, मात्र काही जणांकडून त्याचे उद्‍घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र या भागातील लोकांना योजनेसाठी कोणी प्रयत्न केले आहेत, ते जनतेला माहिती आहे,’’ असेही आमदार पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com