Small Industry Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Subsidy Scheme : लघु उद्योगाच्या कर्जासाठी जुलै अखेरपर्यंत प्रस्ताव द्यावेत

Small Industry : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत लघु उद्योग व्यवसायासाठी थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत ‘अनुदान योजना’, ‘बीज भांडवल योजना’ तसेच ‘थेट कर्ज योजना’ राबविण्यात येतात. थेट कर्ज योजनेचा लाभ मातंग समाज व त्यामध्ये अंतर्भाव असणाऱ्या १२ पोट जातींना घेता येईल.

त्यासाठी अर्जदार पुणे जिल्ह्यातील रहिवासी असावा. वय १८ वर्षे पूर्ण व ५० वर्षाच्या आत असावे. सीबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० असावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल, अशा अटी आहेत.

योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या प्रकल्प मूल्यासाठी महामंडळाचे बीजभांडवल ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये राहील. बीजभांडवल रकमेवर ४ टक्के व्याजदर राहील. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भौतिक उद्दिष्ट ९० प्रकरणांचे प्राप्त झाले आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डची छायांकित प्रत, व्यवसायासाठी आवश्यक जागेचा पुरावा, तीन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला,

शैक्षणिक दाखला, अनुदान, कर्जाचा लाभ न घेतल्याबाबतचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र, आधार क्र. जोडणी केलेल्या बँक खात्याचा तपशील, ग्रामसेवकाचे शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, दुकाने अनुज्ञप्ती, उद्योग आधार जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र अर्जदारांनी अटी व शर्ती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज आदींबाबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे येथे ०२०-२९७०३०५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती घ्यावी, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Winter Weather: राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी साडेचार लाख क्विंटलवर

Sugarcane Crushing Season: ऊस गाळपात यंदा ६६.४ टक्क्यांनी वाढ

Ahilyanagar Nagarapalika Result: नगर परिषद निवडणुकीत महायुतीची दणदणीत सरशी

Nagarapalika Result: नाशिकमध्ये शिवसेनेचा सर्वाधिक ५ जागांवर झेंडा

SCROLL FOR NEXT