Agriculture Drone : महाराष्ट्रातील शेतीत ड्रोनचा वापर का वाढतोय?

Drone Update : ड्रोन व त्यावरील उपकरणाला एकतर जमिनीवरून रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित केले जाते. किंवा ड्रोनला एका विशिष्ट संगणकीय प्रणालीद्वारे वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्याची सोय केलेली असते.
Agriculture Drone
Agriculture DroneAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : जगात शेतीकामांसाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जागतिक कृषी ड्रोन बाजारपेठेचा वार्षिक विकास दर जवळपास ३६ टक्के आहे. २०१५ पर्यंत कृषी ड्रोन मार्केट ५७० कोटी डॉलरवर पोचण्याचा अंदाज नुकत्याच एका संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

भारतातही ड्रोनचा वापर वाढण्यासाठी पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक बाबींवर निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रातही या संबंधात घडामोडी सुरू आहेत. राज्य सरकारने शेती क्षेत्रात ड्रोन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.

तसेच राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट ट्रेनिंग आणि ड्रोनद्वारे किटकनाशकांची फवारणी यांचे प्रशिक्षण दिले जाते. नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation- DGCA डीजीसीए) ड्रोन प्रशिक्षणासाठी मान्यता दिलेले हे देशातील पहिलेच कृषी विद्यापीठ आहे.

ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे शेतीचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. शेती अधिक शाश्‍वत, किफायतशीर, काटेकोर व बदलत्या हवामानाशी अनुकूल करण्यासाठी ड्रोनचा वापर हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Agriculture Drone
Agriculture Drone : ड्रोनद्वारे कार्यक्षमरीत्या कीटकनाशकांची फवारणी शक्य : कुलगुरू डॉ. मिश्रा

ड्रोन म्हणजे काय?

ड्रोन हे एक हवेतून उडणारे मानव विरहित (Unmanned Aerial Vehicle - UAV) स्वयंचलित वाहन आहे. ज्या प्रमाणे जमिनीवरून वाहकाद्वारे चालविल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरला विविध अवजारे व उपकरणे जोडून शेतीतील अनेक कामे करता येतात, त्याच प्रमाणे ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित वाहन आहे.

ड्रोन व त्यावरील उपकरणाला एकतर जमिनीवरून रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित केले जाते. किंवा ड्रोनला एका विशिष्ट संगणकीय प्रणालीद्वारे वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्याची सोय केलेली असते.

ड्रोनचा वापर कशासाठी होतो?

ड्रोनचा वापर शेतीमधील कामे अधिक काटेकोर आणि अचूक करण्यासाठी होतो. त्यामुळे वेळेची आणि मनुष्यबळाचीही बचत होते. सर्वसाधारणपणे पुढील गोष्टींसाठी ड्रोनचा वापर केला जातोः

पीक वाढीचे निरीक्षण आणि विश्लेषण

कार्यक्षम शेती नियोजन

पिकांवर किटकनाशकांची फवारणी, खतांचा वापर

पिकांचे आरोग्य, पीकसंरक्षण

सिंचन व्यवस्थापन

पशुधन निरीक्षण व व्यवस्थापन

Agriculture Drone
Agriculture Drone : ड्रोन प्रशिक्षणासोबतच परदेशात प्लेसमेंटची संधी; खाजगी कंपनीनं केला एनएसडीसीशी करार

ड्रोनच्या वापरामुळे शेतीची उत्पादकता वाढते. वेळ, श्रम, मजूर, पैसे यांची बचत होते. रसायनांचा वापर कमी झाल्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होते. त्यामुळे शेतीत ड्रोनचा वापर वाढत चालला आहे.

ड्रोन हे हवेतून उडणारे वाहन असल्यामुळे त्याच्या वापरासाठी डीजीसीएच्या विविध परवानग्या आणि परवाना लागतो. आजमितीला देशात केवळ पाच कंपन्यांकडे डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन आहेत. ड्रोन भाडेतत्त्वावर देणाऱ्या सेवा पुरवठादारांची संख्या केवळ १५ च्या आसपास आहे.

महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणीचा दर ५०० ते ५५० रूपयांच्या दरम्यान आहे. सलाम किसान ही एकमेव कंपनी आहे की जी थेट शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोनची सेवा पुरवते.

सलाम किसान हे एक सुपरअॅप असून त्या माध्यमातून कृषी मूल्य साखळीतील विविध घटकांना एन्ट टू एन्ड सेवा पुरवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून भाडेतत्त्वावर ड्रोन सेवा पुरवणे, ग्रामीण तरूणांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देणे या क्षेत्रातही या कंपनीने काम सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com