Kolhapur News: यंदा साखर हंगामाला लवकर सुरुवात झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ६६.४ टक्क्यांनी अधिक उसाचे गाळप झाले आहे. गतवर्षी राज्यात २१ डिसेंबरअखेर २६८ लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर यंदा याच कालावधीत ४४६ लाख टन गाळप झाले आहे. पुणे विभाग सर्वाधिक १०९ लाख टन ऊस गाळप करून आघाडीवर आहे. .साखर हंगामातील पहिल्या दीड महिन्यात साखर उत्पादनात मात्र कोल्हापूर विभागाने १० टक्के उतारा नोंदवत ९.८ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. पुणे विभागाने ८.७८ टक्के उताऱ्याने ९.६ लाख टन साखर तयार केली आहे..गेल्या महिन्यापासून राज्याच्या सर्वच भागात पावसाने पूर्ण विश्रांती दिल्याने साखर हंगामाने गती घेतली आहे. राज्यात बहुतांशी साखर कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्रांची मदत पहिल्या टप्प्यात घेतल्याने तोडणीची गती वाढल्याचे चित्र आहे. गेल्या २१ डिसेंबरअखेर २२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा या कालावधीत ३८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे ऊस हंगाम नोव्हेंबरच्या शेवटी पूर्ण क्षमतेने सुरू झाला होता..Sugarcane Crushing Season: ऊस गाळपात खासगी कारखाने आघाडीवर.यंदा एक नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू झाला. मजूर टंचाईमुळे कारखान्यांनी यंदा ऊसतोडणी यंत्रावरच भिस्त ठेवली आहे. ऊस हंगाम सुरू झाल्या झाल्याच अनेक गावांमध्ये प्रत्येक कारखान्यांचे एक तरी यंत्र दाखल झाले आहे. अनेकांनी लगतचे प्लाट घेत तोडणी सुरु केली आहे. काही यंत्रे उसाची रात्रीही तोड करत आहेत. यामुळे सध्या गाळपाला येणाऱ्या उसामध्ये यंत्राने तोडलेला ऊस मोठ्या प्रमाणात येत आहे..मे पासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिला. राज्यातील बहुतांशी ऊस पट्ट्यात हीच स्थिती होती. प्रकाश संश्लेषणाचा अभाव व वाफसा स्थिती नसल्याने उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झाली नाही. याचा प्रतिकूल परिणाम ऊसतोडणीवेळी दिसून येत आहे. अपेक्षेपेक्षा एकरी पाच ते दहा टनांपर्यंत उत्पादनात घट असल्याचे ऊस उत्पादकांनी सांगितले..Sugarcane Crushing Season: ऊस गाळपात खासगी कारखाने आघाडीवर.तोडणी यंत्रणेकडून वेठीस धरणे सुरूचहवामानातील बदलामुळे राज्यातील बहुतांशी उसाला तुरे आले आहेत. यामुळे शेतकरी लवकरात लवकर ऊसतोड व्हावी यासाठी कारखाना यंत्रणेकडे पाठपुरावा करत आहे. कारखान्याने सांगून सुद्धा तोडणी यंत्रणांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे चित्र शिवारात कायम आहे. खुशालीच्या नावाखाली अनेक ऊस उत्पादकांकडून सक्तीने रक्कम घेण्याचे प्रकार कायमपणे होत आहेत. यावर कोणत्याही कारखान्याचे नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. आम्ही सांगून सुद्धा असे प्रकार होत असल्याची कबुली काही कारखान्यांच्या मुख्य शेती अधिकाऱ्यांनी दिली..विभाग सुरू कारखाने ऊस गाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख टन) उतारा(टक्केवारी)कोल्हापूर ३७ ९८ ९.८ १०पुणे ३० १०९ ९.६ ८.७८सोलापूर ४३ ९४ ७.२ ७.६७अहिल्यानगर २६ ५३ ४.२ ७.९६छत्रपती संभाजीनगर २१ ४१ २.९ ७.२३नांदेड २९ ४३ ३.६ ८.३१अमरावती ४ ४.६ ४ ८.६९नागपूर १ ०.३ ०.१ ३.३३एकूण १९१ ४४६ ३८ ८.५२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.