Agriculture Business : शेतीला जोडधंदा शोधताय; हा व्यवसाय नक्की करा, लाखो कमवाल

sandeep Shirguppe

शेतीतील बदलती धोरणे

सध्या शेतीतील बदलत्या धोरणांमुळे फक्त शेती परवड नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी याला जोडधंदा म्हणून काहीतरी शोधत असतो.

Agriculture Business | agrowon

चांगल्या व्यवसायाची संधी

यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आता शेतीसोबतच छोट्या मोठ्या व्यवसायाच्या शोधात असतो. दरम्यान तुम्हाला गावात किंवा जवळच्या शहरात राहून चांगला व्यवसाय करण्याच्या अनेक संधी आहेत.

Agriculture Business | agrowon

पशुखाद्य व्यवसाय

या संधीतील मोठा व्यवसाय म्हणजे पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय होय. या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही वर्षभरात मोठी कमाई करू शकता.

Agriculture Business | agrowon

जनावरांच्या आहाराला मागणी

मक्याची भुसी, गव्हाचा कोंडा, धान्य, केक, गवत इत्यादी कृषी अवशेषांचा वापर करून पशुखाद्य देखील बनवता येते. हा जनावरांचा आहार असल्याने याची मागणी मोठी असते.

Agriculture Business | agrowon

परवाने आवश्यक

दरम्यान हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना आवश्यक असतो. या व्यवसायासाठी परवान्याशिवाय इतरही अनेक नियम आहेत. ज्याचे पालन करणे आवश्यक आहे.

Agriculture Business | agrowon

शासकीय परवाने आवश्यक

पशु चारा फार्मचे नाव निवडून खरेदी कायद्यात नोंदणी करावी लागते. यानंतर FSSAI, पर्यावरण विभाग, ट्रेडमार्क, ISI मानकानुसार BIS प्रमाणन देखील करावे लागेल.

Agriculture Business | agrowon

स्वयंरोजगारासाठी कर्ज

अनेक राज्य सरकारे स्वयंरोजगारासाठी कर्ज देतात. या व्यवसायासाठी तुम्ही हे कर्ज देखील घेऊ शकता. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते.

Agriculture Business | agrowon

वेगवेगळ्या मशिनची आवश्यकता

फीड ग्राइंडर मशिन, कॅटल फीड मशिन, मिक्सर मशिन मिक्सर मशिन आणि डाएट वजनासाठी वेट मशिनची गरज भासते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोक पशुपालन करतात.

Agriculture Business | agrowon

महिन्याला लाखोंचा नफा

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणून तो उदयास येत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला चाऱ्यासाठी सतत ऑर्डर मिळतील. जर तुमचा बिझनेस एकदा चालला तर तुम्ही दर महिन्याला लाखो नफा सहज कमवू शकता.

Agriculture Business | agrowon
Bull market | Agrowon