Grape Cover Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Grape Cover Scheme : द्राक्षबागेच्या प्लॅस्टिक कव्हर योजनेसाठी अर्जप्रक्रिया सुरू

Agriculture Scheme : वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, भागीदार संस्था व फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्ष पिकांचे उत्पादन घेण्यासाठी व अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी कृषी विभागामार्फत प्लॅस्टिक कव्हर योजना मंजूर करण्यात आली आहे.

या योजनेच्या अनुदानासाठी फलोत्पादन या घटकाखाली http://mahadbt.maharashtra.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, भागीदार संस्था व फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी अर्जदार शेतकरी व संस्था व कंपनी यांना द्राक्षबागेच्या नोंदीसह ७/१२ उतारा, ८ अ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पुस्तिकेची प्रथम पानाची छायांकित प्रत, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र तसेच चतु:सीमा नकाशा इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

स्वत:च्या मालकीची जमीन असणारे शेतकरी, तसेच दीर्घ मुदतीचा किमान १५ वर्षे व दुय्यम निबंधकांकडे नोंदणीकृत भाडेकरार या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

जिल्ह्यास दिलेल्या लक्ष्यांकाच्या मर्यादेत लाभार्थी निवडीसाठी प्राधान्य देण्यात येणार असून, या योजनेसाठी प्रति एकर रुपये ४ लाख ८१ हजार ३४४ इतक्या खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रति लाभार्थी २० गुंठे ते १ एकर दरम्यान लाभ देय आहे.

मात्र अनुदान मर्यादा खर्चाच्या ५० टक्के किंवा प्रति एकर रुपये २ लाख ४० हजार ६७२ इतकी असणार आहे. द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर उभारणीसाठी गुणवत्तापूर्ण साहित्य पुरवठा करणेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना बीआयएस मानांकनानुसार तांत्रिक निकषाची पुर्तता करून साहित्याचा पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्या व पुरवठादार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहन

या योजनेमुळे शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या पिकांच्या उत्पादनासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.

राज्यातील द्राक्ष पिकांना केवळ नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे इतकाच या योजनेचा हेतू नसून, ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध होण्याचा उद्देशही फलोत्पादन विभागाने ठेवला असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT