Team Agrowon
या बागेत वेळेवर खरडछाटणी झालेल्या बागेत सध्याच्या स्थितीत काडी परिपक्वतेचा हा कालावधी असेल. या कालावधीत काडी परिपक्व होऊन वाढ नियंत्रणात असणे गरजेचे असते.
काडी परिपक्वतेच्या नंतरची फूट ही अनावश्यक असते. काडीवर आवश्यक पानांच्या संख्येनंतर निघालेली पाने ही शेंडा पिंचिंगद्वारे काढून टाकली जातात. आपल्याकडे सर्व बागा जवळपास डॉगरीज या खुंटावर कलम केलेल्या आहेत. या खुंटावरील बागेत स्वमुळाच्या तुलनेत शेंडा वाढ जास्त होते.
बऱ्याचशा बागेत पाऊस सुरू होत असताना काडीवर डोळे एकतर कापसलेले दिसतात, किंवा फुटताना दिसतात. ही समस्या सूक्ष्म घड निर्मितीच्या साधारण शेवटच्या टप्प्यात दिसून येईल. काडी परिपक्व झाल्यानंतरच्या अवस्थेतील बागेत ही अडचण येत नाही. सूक्ष्म घडनिर्मितीच्या काळामध्ये आपण बागेत पाणी कमी करतो.
पालाशचा वापर दोन आठवड्यांकरिता पूर्णपणे बंद करावा. जमिनीतून तसेच फवारणीद्वारे नत्रयुक्त खतांचा वापर करावा. शेंडा वाढ होण्यासाठी पाण्याची मात्रा वाढवावी.
कुणी बागेत पॅक्लोब्युट्राझोल किंवा क्लोरमेक्वाट क्लोराइड (सीसीसी) यांचे वेलीच्या मुळामध्ये ड्रेंचिग करतात. यासोबत प्रोपीकोनॅझोल अशा बुरशीनाशकाचा वापर करतात. यामुळे शेंडा थांबतो.
सूक्ष्मघड निर्मितीसंदर्भात सीसीसी या रसायनाच्या वापराबाबत द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये संशोधन सुरू करण्यात आलेले आहे. मात्र त्याची अधिकृत शिफारस केलेली नाही. अशा शिफारस न केलेल्या रसायनांचा वापर जाणिवपूर्वक टाळावा.
बागेत शेंडा थांबलेला आहे, अशा ठिकाणी शाकीय वाढीला चालना मिळण्यासाठी फारशी संधी नसते. वेलीत या वेळी अचानक दाब निर्माण होतो आणि कच्ची ते अर्ध परिपक्व काडीवरील नाजूक डोळ्यामध्ये दाब निर्माण होऊन फुटण्याची प्रक्रिया सुरू होते.