Agriculture Machinery Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Machinery : कृषी अवजारे, यंत्रांचा लाभ ३४ हजार शेतकऱ्यांनी नाकारला

शेतकऱ्यांना शेती करताना यांत्रिकीकरणाचा लाभ मिळावा, यासाठी शेती अवजारे, यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, या साठी कृषी विभागातर्फे यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबवली जात आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः नगर जिल्ह्यात यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) उपअभियानातून शेती अवजारे (Agriculture Tools), यंत्रांसाठी (Machinery) दोन वर्षांत २ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले. मात्र गरज नसलेल्या बाबीसाठी निवड झालेल्या सुमारे ३४ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतलाच नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द झाली आहे. (Farmers Rejected The Benefit Of Agricultural Tools And Machinery)

शेतकऱ्यांना शेती करताना यांत्रिकीकरणाचा लाभ मिळावा, यासाठी शेती अवजारे, यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, या साठी कृषी विभागातर्फे यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबवली जात आहे. त्यात भरडधान्य विकास योजनेतून मका सोलणी यंत्र, ऊसविकास योजनेतून पाचटकुट्टी, कापूस विकास योजनेतून कापूस फरदड कुट्टी यंत्र, राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेतून विविध यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पौष्टिक, तृणधान्य, गळीतधान्य तेलताडमधून अवजारे आदींसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरले जातात. यांत्रिकरणासह अन्य योजनांसाठी नगर जिल्ह्यात यांत्रिकरणासाठी २ लाख १८ हजार ५२४ अर्ज आले. त्यातून साडेसात हजार शेतकरी पात्र ठरले म्हणजे आलेल्या अर्जाच्या तीन टक्के शेतकऱ्यांनाच यांत्रिकरणातून लाभ मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

नगर जिल्ह्यात मजूर टंचाई, शेतीच्या कामाची होणारी धावपळ पाहता ट्रॅक्टर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे यांत्रिकीकरण उपअभियानातून ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळावे, यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

यांत्रिकीकरण घटकांसाठीची दोन वर्षांतील स्थिती

एकूण अर्ज...२ लाख १८ हजार ५२४

सोडतीत निवड झालेले लाभार्थी...४९५३८

निवड रद्द झालेले लाभार्थी...३४ हजार ०३९

निवडीनंतरच्या प्रक्रियेत सहभागी लाभार्थी...१५,३९९

लाभ घेऊन बिले सादर...८३७९

अनुदानास पात्र लाभार्थी...७४८१

प्रत्यक्ष अनुदान मिळालेले लाभार्थी...६४१२

वितरित अनुदान...३७ कोटी ४१ लाख २८ हजार रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT