सोलापूर ः कृषी यांत्रिकीकरण योजनेत  समावेशासाठी द्या प्रस्ताव 

सोलापूर ः राज्यात कृषी विद्यापीठांद्वारे विकसित नवीन यंत्रे/औजारांचे उत्पादन करण्यासाठी खासगी उत्पादकाची नियुक्ती करणे आणि सदर औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत समावेश करणेबाबत तसेच खाजगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण यंत्र औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
Proposal for inclusion in agricultural mechanization scheme
Proposal for inclusion in agricultural mechanization scheme
Published on: 
Updated on: 

सोलापूर ः राज्यात कृषी विद्यापीठांद्वारे विकसित नवीन यंत्रे/औजारांचे उत्पादन करण्यासाठी खासगी उत्पादकाची नियुक्ती करणे आणि सदर औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत समावेश करणेबाबत तसेच खाजगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण यंत्र औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर कृषी यंत्रे व औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्यासाठी अशा उत्पादकांकडून प्रस्ताव (Expression of Interest) मागविणे येत आहेत. 

राज्यातील चारही कृषी विद्यापीठाद्वारे विविध प्रकारची नावीन्यपूर्ण औजारे विकसित करण्यात आलेली आहेत. तथापि, सदर औजारांचे विद्यापीठाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन करण्याच्या मर्यादा लक्षात घेता त्याचा लाभ शेतकऱ्यांना देता येत नाही. तसेच खासगी उत्पादकांनी देखील अनेक नावीन्यपूर्ण यंत्र व औजारे विकसित केलेली आहेत. परंतु त्याचा योजनेत समावेश नसल्यामुळे ती शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होत नाहीत. यासाठी उत्पादकांची राज्यस्तरीय नोंदणी प्रक्रिया राबविणेबाबतची कार्यपद्धती, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे ई. बाबतचा सविस्तर तपशील http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांनी विहित अटी व शर्तीच्या अनुषंगाने नोंदणीचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) ,कृषी आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य ,पुणे-०१ या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी कळविले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com