Solar Projectq
Solar Projectq Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Solar Energy : सातारा जिल्ह्यात सोलर पॅनेलवरील २०२ योजना मंजूर

टीम ॲग्रोवन

सातारा : जलजीवन मिशन योजनेंतर्गत (Jal jeevan Mission Scheme Satara) सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहेत. जिल्ह्यात सोलर पॅनेलवर (Solar Panel) चालणाऱ्या २०२ योजना मंजूर झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ४१ योजना कऱ्हाड तालुक्यातील (Karhad Village) आहेत. बहुतांश योजना सौरऊर्जेवर चालणार असल्याने गावोगावच्या वीजबिलांचाही प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.

ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने गावागावांत प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. २०२४ पर्यंत ‘हर घर जल से नल’ हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवत प्रत्येकाला पाणी उपलब्ध करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात, तर शहरी भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.

२०२४ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणी करून पाणीपुरवठा करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनांसाठी सुरुवातीला वीजबिलाचा मोठा अडथळा होता. आधीच गावच्या पथदिव्यांची वीजबिले थकल्याने महावितरणने अनेक गावांची वीज जोडणी तोडली होती.

त्यात आता जलजीवन योजनांचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतीवर पडत होता. मात्र, आता योजनेतील बहुतांशी योजना सौरऊर्जेवर चालणार असल्याने वीजबिलांचा अडथळा दूर होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ४३ कुटुंबे असून, आतापर्यंत सुमारे चार लाख ७५ हजार ६०४ कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे. जलजीवन मशिनमध्ये पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून, त्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे.

याचबरोबर १७५ योजनांना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱ्यामार्फत निधीही वितरित केला आहे. जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

१३ गावांमधील कामे मार्गी

या योजनेमुळे जुन्या पाणीपुरवठा योजनाही निधी मिळाल्यामुळे त्या ऊर्जितावस्थेत येणार आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील एकूण गावांपैकी ४० गावांमध्ये जागेअभावी योजनेचे कामे रखडली होते; परंतु सद्यःस्थितीत १३ गावांमधील कामे मार्गी लागले असून, उर्वरित कामेही लवकर सुरू होतील, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

SCROLL FOR NEXT