
वसई :पालघर जिल्ह्यातील (Palghar District) नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून जलजीवन मिशन (Jal Jivan Mission) अंतर्गत योजना आखण्यात आली आहे. या योजनेद्वारे (Government Scheme) एकूण चार लाख ४२ हजार घरांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी एक लाख ४० हजार घरांच्या नळजोजनेचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात पाण्याची टंचाई जाणवते.
त्यामुळे अनेक किलोमीटर पायपीट करून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून नियोजन केले जात आहे. जलजीवन मिशन योजनेतून पालघर, वसई, डहाणू, वाडा, जव्हार, तलासरी, विक्रमगड, मोखाडा तालुक्यातील ७३३ गावांना पाणी मिळणार आहे. यापैकी काही काम पूर्ण झाले आहे.
तर मुख्य व अंतर्गत जलवाहिनी, गावातील घरांचे अंतर व त्यानुसार क्षमता, पंपगृह व नळजोडणी अशी कामे हाती घेतली आहेत. अद्याप तीन लाख घरांचे उद्दिष्ट शिल्लक असल्याची माहिती पाणी विभागाचे अभियंता गंगाधर निवडंगे यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार आहे.
पाण्याचे स्रोत उपलब्ध करण्याचा प्रयत्न एकीकडे पावसाळ्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना त्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असते. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी स्रोतांचा शोध घेतला जातो, तर ट्रॅकरची व्यवस्था करावी लागते. या गावांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून घरी पाणी मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात घरोघरी पाणी मिळावे, याकरिता जालमिशन योजना राबवली जात आहे. पाणी विभागाकडून काम सुरू आहे. काही भागात नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.
- सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.