
अकोला : तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक मंडलामध्ये अतिवृष्टीमुळे (Wet Drought) पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा (Crop Insurance) लाभ द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने तहसीलदारांकडे (Collector Office) केली आहे.
या बाबत तहसीलदार संतोष येवलीकर यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर व शेतकऱ्यांनी निवेदन दिले. अतिवृष्टीमुळे तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निधीतून मदत द्यावी.
ज्या शेतकऱ्यांनी पीकविम्याची ऑनलाइन किंवा ऑफलाइन तक्रार केली, त्यांच्या बांधावर विमा कंपनीचे प्रतिनिधी अद्यापही पोहोचलेले नाहीत. त्यामुळे आगामी रब्बीचा हंगाम पाहता शेतातील उभे पीक मोडावे की नाही, या संभ्रमात पडलेले आहेत.
या प्रकरणी योग्य ते निर्देश देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी कौठकर यांच्यासह गोपाल निमकर्डे, नीलेश नेमाडे, गजानन नेमाडे, दिनेश गिऱ्हे, नरेंद्र निमकर्डे, रामकिशोर थुटे, राहुल मानमोडे, प्रणव अढाऊ, सोपान इंगळे व इतर शेतकऱ्यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.