Transformer Issues: बागायती पिकांत सिंचनास वेग, अनेक रोहित्र नादुरुस्त

Irrigation Issue: ऐन श्रावणात पावसाने दडी मारली आहे. ऊन, उष्णतेने केळीसह कापूस व अन्य बागायती पिकांत सिंचन सुरू आहे. दुसरीकडे अनेक शिवारांत नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
Transformer Issues
Transformer IssuesAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: ऐन श्रावणात पावसाने दडी मारली आहे. ऊन, उष्णतेने केळीसह कापूस व अन्य बागायती पिकांत सिंचन सुरू आहे. दुसरीकडे अनेक शिवारांत नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करण्याबाबत चालढकल आणि दुसरीकडे या रोहित्राच्या माध्यमातून कृषिपंपांसाठी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीजबिलासंबंधी सूचना पाठविल्याचा प्रकार अनेक गावांत घडला आहे. या प्रकारावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रतनिधी वीज वितरण कंपनीवर नेहमी शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढायचे, पण आता रोहित्र दुरुस्ती तर होतच नाही, पण वसुलीसाठी सूचना कशा पाठविल्या जातात, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Transformer Issues
Transformer Repair : रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ऑइलचा तुटवडा

आता पाऊस नसल्याने पपई, केळी, पूर्वहंगामी कापूस, भाजीपाला आदी पिकांत सिंचन सुरू आहे. जळगाव, चोपडा, यावल, रावेर भागात वीज कंपनी शेतकऱ्यांना वारंवार वेठीस धरते. यातच शिंगाडे म्यान झाले का, वीज वितरण कंपनीतील समस्या सुटल्या का, सर्व आलबेल आहे का, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. अनेक गावांत कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त झाले आहे. ते यापूर्वीदेखील नादुरुस्त झाले व बंद पडले. त्या वेळेस शेतकऱ्यांनी खासगी कर्मचाऱ्याची मदत घेऊन दुरुस्ती करून घेतली. 

पावसाळ्यात अडचणी अधिक

पाऊस नसल्याने शेतकरी सिंचनासाठी धावपळ करीत आहेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त असल्याने कृषिपंप सुरू होत नाहीत. अनेक भागांत रोहित्राची एकदाही वीज वितरण कंपनी किंवा संबंधितांनी दुरुस्ती केली नाही. शेतकऱ्यांना पदरमोड करून रोहित्राची दुरुस्ती करून घ्यावी लागते.

Transformer Issues
Transformer Theft: पूर्व हवेलीत रोहित्र चोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत ३९ चोरी!

रोहित्राची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशातच शेतकऱ्यांना वीजबिलासंबंधी भरणा करण्याच्या तोंडी सूचना दिल्या जात आहेत. पाच व साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपांना वीजबिल माफी नाही. काही महिनेच या पंपांचे वीजबिल शासनाने भरले. आता शेतकऱ्यांना बिल भरायचे आहे, असे वीज कर्मचारी सांगत आहेत.

यावरून शेतकऱ्यांमध्ये आणखी संताप वाढला आहे. विजेच्या समस्या तशाच कायम आहेत, त्या वीज वितरण कंपनी सोडवित नाही आणि दुसरीकडे बिलांची मागणी केली जाते. शासनही ठोस आदेश, सूचना देत नाही. कृषिपंप बंदच्या काळात वीजवापरच झाला नाही, तर पैसे कसे भरायचे, वीजबिल माफीची घोषणा केली होती, त्याचे काय झाले, वसुली कशी करता, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com