Agriculture Technology: कृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर त्याचा लाभ घेण्यासाठीची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. तसेच प्रत्यक्ष शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे देखील आहे. मशागतीपासून ते पिकांची काढणी-विक्री यांत शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत असतात. परंतु या अडचणी योग्य वेळेत योग्य माहिती अथवा सल्ला देऊन दूर केल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
सर्वसमावेशक अद्ययावत माहितीचा अभाव आणि मनुष्यबळाची कमतरता याचा हा परिणाम आहे. कृषी विभागात जवळपास ५० टक्के पदे रिक्त आहेत. गाव पातळीवरील कृषी सहायकाकडे दोन-तीन गावे दिली गेली आहेत. अधिकाऱ्यांच्या पातळीवरही अनेक पदांचा भार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. अशा एकंदर परिस्थितीमध्ये शेती शाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा जलद गतीने प्रसार हा झालाच पाहिजे, यात दुमत असण्याचे कारण नाही.
परंतु सर्व सुधारणा एकदाच करताना ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे होता नये. हे ॲप दोन टप्प्यांत (पहिला टप्पा मेअखेर आणि दुसरा टप्पा सप्टेंबरअखेर) विकसित होणार असून, व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा जागर करणार असल्याचे कळते. कृषीचे ॲप तयार होऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला अजून बराच वेळ आहे. अर्थात, येत्या खरिपासाठीच्या नियोजन, आराखडा बैठकांपासून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी या ॲपचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या वर्षीच्या नियोजन बैठका, शेतीशाळा या नेहमीप्रमाणे व्हायला हव्यात, त्यात खंड पडता कामा नये.
ॲपसाठी माहितीचे स्रोत हे प्रामुख्याने कृषी आयुक्तालय, कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाचेच विविध प्रकल्प आहेत. पाणी फाउंडेशन सोडले, तर इतर कोणत्याही बाहेरच्या संस्थेचा सहभाग माहिती स्रोतांमध्ये नाही. त्यामुळे या ॲपची माहिती कितपत अद्ययावत असणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या गरजांनुसार संशोधनात कृषी विद्यापीठे खूप मागे आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरताहेत.सध्या शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ल्यासह बाजारभावापर्यंतची माहिती थेट मोबाइलवर मिळते.
ही माहिती कृषी विभागासह काही खासगी व्यावसायिक देतात. परंतु अशी माहिती ही सर्वसामान्य असते. अशावेळी या नव्या ॲपद्वारे दिली जाणारी माहिती ही स्पेसिफिक (विशिष्ट) हवी. मॉन्सून आणि मार्केट हे दोन्ही वेगाने बदलत आहेत. अशावेळी सर्वसामान्य माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही, तर त्यांना विशिष्ट माहितीच द्यावी लागणार आहे. त्यामुळे कृषी विभागाकडे आता वैयक्तिक शेतकऱ्यासह त्याच्या पीक पद्धतीची अद्ययावत माहिती असायला हवी.
असे असेल तर वैयक्तिक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विशिष्ट माहिती त्यांना देता येईल. हे काम नव्या ॲपच्या माध्यमातून व्हायला हवे. त्याचबरोबर माती-पाणी, कीड-रोग नमुने तपासून, त्याचे विश्लेषण करून त्यानुसार पीक पोषण तसेच संरक्षण शिफारशी शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. स्थानिक ते जागतिक बाजारपेठेतील शेतीमालनिहाय आवक तसेच त्यास मिळणारा भाव याची देखील माहिती शेतकऱ्यांना आता हवी आहे. नव्या ॲपद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे शेतकऱ्यांच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर व्हायला हव्यात. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात डाटा संकलन, विश्लेषण करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम अवघड नाही. परंतु त्यासाठी गरज आहे ती शासन-प्रशासनाच्या प्रबळ इच्छाशक्तीची!
‘ॲप’ने अडचणी दूर होतील?
सर्वसामान्य (जनरल) माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना आता होताना दिसत नाही. अशावेळी नव्या ॲपच्या माध्यमातून विशिष्ट (स्पेसिफिक) माहिती त्यांना मिळायला हवी. कृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर त्याचा लाभ घेण्यासाठीची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. तसेच प्रत्यक्ष शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे देखील आहे.
मशागतीपासून ते पिकांची काढणी-विक्री यांत शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत असतात. परंतु या अडचणी योग्य वेळेत योग्य माहिती अथवा सल्ला देऊन दूर केल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. सर्वसमावेशक अद्ययावत माहितीचा अभाव आणि मनुष्यबळाची कमतरता याचा हा परिणाम आहे. कृषी विभागात जवळपास ५० टक्के पदे रिक्त आहेत. गाव पातळीवरील कृषी सहायकाकडे दोन-तीन गावे दिली गेली आहेत. अधिकाऱ्यांच्या पातळीवरही अनेक पदांचा भार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.
अशा एकंदर परिस्थितीमध्ये शेती शाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा जलद गतीने प्रसार हा झालाच पाहिजे, यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु सर्व सुधारणा एकदाच करताना ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे होता नये.
हे ॲप दोन टप्प्यांत (पहिला टप्पा मेअखेर आणि दुसरा टप्पा सप्टेंबरअखेर) विकसित होणार असून, व्हिडिओ आणि ऑडिओद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा जागर करणार असल्याचे कळते. कृषीचे ॲप तयार होऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला अजून बराच वेळ आहे. अर्थात, येत्या खरिपासाठीच्या नियोजन, आराखडा बैठकांपासून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी या ॲपचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या वर्षीच्या नियोजन बैठका, शेतीशाळा या नेहमीप्रमाणे व्हायला हव्यात, त्यात खंड पडता कामा नये.
ॲपसाठी माहितीचे स्रोत हे प्रामुख्याने कृषी आयुक्तालय, कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाचेच विविध प्रकल्प आहेत. पाणी फाउंडेशन सोडले, तर इतर कोणत्याही बाहेरच्या संस्थेचा सहभाग माहिती स्रोतांमध्ये नाही. त्यामुळे या ॲपची माहिती कितपत अद्ययावत असणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या गरजांनुसार संशोधनात कृषी विद्यापीठे खूप मागे आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरताहेत.सध्या शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ल्यासह बाजारभावापर्यंतची माहिती थेट मोबाइलवर मिळते.
ही माहिती कृषी विभागासह काही खासगी व्यावसायिक देतात. परंतु अशी माहिती ही सर्वसामान्य असते. अशावेळी या नव्या ॲपद्वारे दिली जाणारी माहिती ही स्पेसिफिक (विशिष्ट) हवी. मॉन्सून आणि मार्केट हे दोन्ही वेगाने बदलत आहेत. अशावेळी सर्वसामान्य माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही, तर त्यांना विशिष्ट माहितीच द्यावी लागणार आहे. त्यामुळे कृषी विभागाकडे आता वैयक्तिक शेतकऱ्यासह त्याच्या पीक पद्धतीची अद्ययावत माहिती असायला हवी.
असे असेल तर वैयक्तिक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विशिष्ट माहिती त्यांना देता येईल. हे काम नव्या ॲपच्या माध्यमातून व्हायला हवे. त्याचबरोबर माती-पाणी, कीड-रोग नमुने तपासून, त्याचे विश्लेषण करून त्यानुसार पीक पोषण तसेच संरक्षण शिफारशी शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. स्थानिक ते जागतिक बाजारपेठेतील शेतीमालनिहाय आवक तसेच त्यास मिळणारा भाव याची देखील माहिती शेतकऱ्यांना आता हवी आहे.
नव्या ॲपद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे शेतकऱ्यांच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर व्हायला हव्यात. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात डाटा संकलन, विश्लेषण करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम अवघड नाही. परंतु त्यासाठी गरज आहे ती शासन-प्रशासनाच्या प्रबळ इच्छाशक्तीची!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.