Nashik News: यंदा लेट खरीप हंगामात रांगडा कांदा लागवडीचे क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले. मात्र लागवडीपश्चात झालेल्या अतिवृष्टीमुळे ६९ हजार २६८ हेक्टर क्षेत्रापैकी २७ हजार ८७४ हेक्टरवरील लागवडी बाधित झाल्या आहेत. क्षेत्रवाढ होऊनही लेट खरीप कांदा लागवडी अडचणीत सापडल्याची स्थिती आहे..कृषी विभागाने दिलेली माहिती अशी, की जिल्ह्यात लेट खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये यंदा एकूण ६९ हजार २६८.७० हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली. मात्र ऑक्टोबरअखेर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात कांदा लागवडीचे नुकसान वाढले. प्रामुख्याने कसमादे व पूर्व भागात अतिवृष्टीमुळे २७ हजार ८७४.४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. लागवडीपैकी ४१ हजार ३९४.२१ हेक्टर क्षेत्र वाचले. मात्र उत्पादनात मोठी घट संभवते..Onion Cultivation : खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात.चांदवड तालुक्यात सर्वाधिक लागवडी होत्या. मात्र अतिवृष्टीने जवळपास निम्म्या कांदा लागवडी बाधित आहेत. देवळा तालुक्यातील कांदा लागवडी झाल्या. मात्र पावसाच्या तडाख्यात निम्म्याहून अधिक लागवडी बाधित झाल्याने मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे अतिवृष्टिमुळे नुकसान तर दुसरीकडे प्रतिकूल वातावरण असल्याने उत्पादन खर्चासह नंतरच्या टप्प्यात पीक संरक्षण खर्चदेखील दुपटीने झाला आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत..खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने मालेगाव तालुक्यात लेट खरीप कांद्याच्या लागवडीत वाढ दिसून आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कळवण तालुक्यात वाढ अधिक आहे. मात्र नुकसानदेखील यंदा जास्त आहे. देवळा तालुक्यात यंदा क्षेत्र वाढले. मात्र पावसाने मोठा फटका या भागात बसला. सटाणा तालुक्यात लागवडी स्थिर होत्या; मात्र नुकसान वाढले. नांदगावमध्ये क्षेत्र आणि नुकसानदेखील वाढले. चांदवड तालुक्यातील यंदा वाढ झाली आहे. यंदा येवला तालुक्यात मागील वर्षीच्या लागवडीखालील क्षेत्र टिकून आहे..Onion Cultivation : कांदा रोपे विक्रीला कमी प्रतिसाद.असे आहे नुकसान :- कोलेटोट्रिकम या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या पातीला पिळे पडून वाढ खुंटली- लागवडीत सतत पाणी साचून राहिल्याने रोपांची मर होऊन लागवडी विरळ- सुरुवातीच्या लागवडीमध्ये ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाश नसल्याने कंद्याची वाढ अपेक्षित नाही- कांदा पोसण्याच्या अवस्थेत प्रक्रिया बाधित; परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता.कांदा लागवडीची तालुकानिहाय स्थिती : (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका...अंतिम लागवड...पावसामुळे बाधित क्षेत्र...पावसात वाचलेले क्षेत्रमालेगाव...११,२५७...०...११,२५७बागलाण...३,८९२...३,०३०.१६...८६१.८३कळवण...३,६८३...३,०३०.०४...६५२.९६देवळा...९,४४५...६,६०७.४८...२,८३७.५१नांदगाव...८,७००...१,७२७.९६...६,९७२.०४दिंडोरी...२५१...४६.४५...२०४.५५निफाड...६८०.७...४८०.९८...१९९.७१सिन्नर...५,५८७...१,८३६.८५...३,७५०.१५येवला...७,८२३...३,०२२.५६...४,८००.४३चांदवड...१७,९५०...८,०९१.९७...९,८५८.३एकूण...६९,२६८.७०...२७,४७४.४९...४१,३९४.२१.अनेक ठिकाणी लागवडीमध्ये निम्म्यावर नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार लागवड केली आहे. मात्र हंगामात उत्पादकता कमी होऊन कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम संभवतो. बुरशीजन्य रोगामुळे पीक संरक्षण खर्चात वाढ झाली आहे.डॉ. सतीश भोंडे, माजी अतिरिक्त संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.