Agriculture App: शेतीसाठी ॲप मेपर्यंत

AI in Farming: शेतकरी विस्तार सेवांची परिणामकारकता वाढविण्यासाठी आणि कृषिविषयक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वसमावेशक शेती शाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
Agriculture Developement
Agriculture DevelopementAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: शेतकरी विस्तार सेवांची परिणामकारकता वाढविण्यासाठी आणि कृषिविषयक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वसमावेशक शेती शाळा आणि शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ॲप विकसित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, उसासह अन्य पिके आणि पशुसंवर्धनासाठीही याचा वापर करण्यात येणार आहे. या ॲपचा पहिला टप्पा मे पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. तर शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा टप्पा सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याची कालमर्यादा निश्‍चित केली आहे.

हे ॲप शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत, यंत्र अवजारांबाबत, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एकात्मिक अभियान प्रणाली आणि प्रत्येक पिकासाठी तयार केलेल्या प्रमाण कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यास मदत करेल. डिजिटल शेतीशाळा, पाणीशाळा, पशुशाला यांच्या माध्यमातून मृदा आरोग्य, जलव्यवस्थापन आणि पशुसंवर्धन यांच्याशी निगडित शैक्षणिक संसाधनांचीही माहिती देण्यात येणार आहे.

Agriculture Developement
AI in Agriculture: ‘एआय’चा बोलबाला

या ॲपची विस्तार या केंद्र सरकारच्या अद्ययावत आणि विद्यमान संरचनांशी सांगड घालण्यात येणार आहे. व्यक्तिगत पातळीवर अधिक ज्ञान मिळविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिक शिक्षण तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. या ॲपद्वारे केवळ पीक उत्पादनच नव्हे तर काढणीपश्चात प्रक्रियेसंदर्भातही माहिती दिली जाणार आहे.

...असे असेल ॲप
- प्रत्यक्ष शेतीशाळा भेट आणि प्रत्येक पिकासाठी विस्तार यंत्रणेतील कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेण्यास मदत प्रणाली
- शेतकऱ्यांसाठी अभिप्राय प्रणाली, यामध्ये शिक्षण मापनप्रणाली आणि सामुदायिक विषयनिर्मिती यांचा समावेश असेल. जेणेकरून प्रत्येक शेती शाळेद्वारे दिलेले शिक्षण आणि त्याची उपयुक्तता नोंदवता येईल

Agriculture Developement
Agriculture Ai: अकृत्रिम इच्छाशक्ती हवी

- पीक हंगामात प्रत्येक पिकासाठी निश्‍चित केलेल्या प्रमाण कार्यपद्धतीनुसार सूचनांद्वारे शेतकऱ्यांना मदत करणे
- शेतीशाळा, पाणीशाळा आणि पशुशाळा प्रसारित करण्याचे माध्यम
- विस्तार नेटवर्कमधील ज्ञानाचा फायदा
- कृषी प्रक्रिया आणि विपणनासह काढणीपश्‍चात मूल्यसाखळीसंदर्भात शिक्षण साहित्य उपलब्ध करून देणे

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या माहितीचे स्रोत

शेती शाळा : कृषी आयुक्तालय, कृषी विद्यापीठे, महाबीज
पीक हंगाम कार्यपद्धती : कृषी विद्यापीठे, कृषी आयुक्तालय, पाणी फाउंडेशन
काढणी पश्‍चात मूल्यसाखळी सामग्री : कृषी आयुक्तालय, स्मार्ट प्रकल्प, मॅग्नेट, कृषी विद्यापीठे
व्हिडिओ ऑडिओ सामग्री : कृषी आयुक्तालय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, स्मार्ट, मॅग्नेट, पाणी फाउंडेशन, महाबीज
भविष्यातील व्हिडिओ आणि ऑडिओ : वनामती, स्मार्ट, कृषी आयुक्तालय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाबीज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com