The Teachings of Timmacca and Bezalel : जवळपास एकसारख्याच ध्येयाने पछाडलेल्या दोन दिग्गजांचा मृत्यू केवळ दोन दिवसांच्या फरकाने होणे, याला योगायोग म्हणावे की नियतीचा खेळ! या दिग्गजातील एक नाव आहे सालुमरदा तिम्मक्का, ज्यांचे १४ नोव्हेंबर २०२५ ला वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले, तर यातील दुसरे नाव असलेल्या एलियाहू बेझालेल यांचे १६ नोव्हेंबर २०२५ ला वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. .मूळचे केरळचे असलेले बेझालेल यांनी वयाच्या २५ व्या वर्षी (१९५५ मध्ये) अनेक कोचीन यहुदींसोबत केरळमधून थेट इस्राईल गाठले. त्यांच्या मते स्थलांतर हे केवळ भौगोलिक जागा बदलण्यापुरते मर्यादित नसते, तर ते मानसिक अव्यवस्थेशी देखील जोडलेले असते. सुरुवातीला मेंढपाळाचे काम करावे लागलेल्या बेझालेल यांनी पुढे इस्राईलमधील नेगेव वाळवंटात वृक्ष संगोपनातून नंदनवन फुलविले. शेतीतही त्यांनी अनेक प्रयोग केले. इस्राईल हा देश हॉलंडमध्ये फुले निर्यात करणारा दुसरा सर्वात मोठा देश ठरला त्यामागे बेझालेल यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे..Environment Conservation : पर्यावरण संवर्धनामध्ये मधमाशी मोलाची....सालुमरदा तिम्मक्काचा जन्म कर्नाटकातील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्यामुळे त्यांनी शिक्षण वगैरे घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यांची गाठ बालपणापासून शेळया-मेंढ्या चारण्याबरोबर शेतीकामांशी पडलेली. गरिबीच्या हालअपेष्टांसोबत लग्नानंतर त्यांना मूल होत नसल्याने अनेक जण त्यांच्याकडे तुच्छतेने देखील पाहत होते. या व्यथांचा विसर पडावा म्हणून त्यांनी वृक्ष लागवडीत स्वतःला गुंतवून घेतले. तिम्मक्कांनी पती बिक्कल चिक्कयांसोबत हुलिकल ते कुद्दुरदरम्यान चार किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वडांची झाडे लावून अगदी पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांचे संगोपन केले आणि त्या वृक्षमाता बनल्या..त्यांच्या या वृक्ष लागवडीच्या कामातूनच पुढे पृथ्वी बचाओ अभियानाने जन्म घेतला. तिम्मक्कांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तर बेझालेल यांना देखील इस्राईलने अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. भारताने देखील प्रवासी भारतीय हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला..Environment Day : पर्यावरण समृद्ध करणारी मोहाडीची देवराई .आज तापमानवाढ आणि त्याआनुषंगाने हवामान बदलाचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. वृक्षतोडीबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास असा निसर्गात वाढलेला मानवाचा वाढता हस्तक्षेप हे बदलत्या हवामानाचे मुख्य कारण आहे. बदलत्या हवामानाचा भविष्यात सामना कसा करायचा, याबाबतचे जागतिक पातळीवर मंथन मागील दोन दशकांपासून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून ब्राझीलमध्ये कॉप-३० परिषद सध्या सुरू आहे. अशा परिषदांमध्ये आरोप-प्रत्यारोपानंतर काही उपाययोजना सुचविल्या जातात..परंतु त्या उपाययोजनांची बहुतांश देशांकडून अंमलबजावणी होत नाही. पर्यायाने समस्या कायम राहते. अशा वेळी तिम्मक्का असो वा बेझालेल यांनी वृक्ष लागवडीसह शाश्वत पर्यावरणपूरक शेती विकासातून एक दिशादर्शक काम जगासमोर ठेवले आहे. तिम्मक्का आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी लावलेल्या वृक्षाच्या सावलीच्या रूपाने त्या सदैव आपल्यासोबत आहेत. बेझालेल यांने शेवटपर्यंत भारताबरोबर जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे..सह-अस्तित्व काय असते हे भारताकडून मी शिकलो असे ते सांगत असत. त्यांच्या शेतीतील विविध प्रयोगांचे आपल्या देशातील कृषितज्ज्ञांबरोबर राज्यकर्त्यांनाही आकर्षण राहिले आहे. आपल्या देशात अनेक कारणांनी शेतीचे वाळवंटीकरण झपाट्याने होताना बेझालेल यांच्यापासून प्रेरणा घेऊन तिथे नंदनवन फुलविता येईल का, यावर विचार करण्याची वेळ आता आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.