Lumpy Skin Disease Agrowon
संपादकीय

Lumpy Skin Disease : विळखा घातक ‘लम्पी’चा!

Lumpy Skin Vaccine : राज्यात प्रत्यक्ष लागण झालेल्या आणि आजाराची संभाव्य लक्षणे दाखवत असलेल्या विभाग, जिल्हानिहाय सर्व जनावरांची नोंद करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करायला हवेत.

विजय सुकळकर

Lumpy Skin Outbreak Maharashtra : वर्ष २०२० च्या उन्हाळी हंगामात राज्यात दाखल झालेला, त्यानंतर २०२२ च्या हंगामात थैमान घालणारा ‘लम्पी स्कीन’ आजार राज्यात आता पुन्हा डोके वर काढत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्यात अनेक जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली असताना पशू संवर्धन विभागाला मात्र अद्याप एकाही पशुधनाला लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला नाही, हे थोडे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. स्थानिक पातळीवरील पशू संवर्धन अधिकारी ‘प्रादुर्भाव विरळ आहे’, ‘उपचार सुरु आहेत’, असे सांगत आहेत.

खरे तर २०२२ - २३ मध्ये लम्पी स्कीन ने बाधित जनावरांची संख्या कमी असली तरी मृतांचा आकडा वाढला होता. विशेष म्हणजे २०२० नंतर दरवर्षी राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. लम्पी स्कीन हा जनावरातील विषाणूजन्य आजार असून याचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड आदी कीटकांपासून होतो. लम्पी स्कीन आजाराबाबत राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले म्हणूनही स्वस्थ बसता येणार नाही.

कारण पशुधनाला देण्यात आलेली लस ‘गोट पॉक्स’ची (शेळ्यातील देवी) पर्यायी लस म्हणून वापरण्यात आली आहे. या लसीची परिणामकारकता ८० टक्क्यांपर्यंतच असल्याने लसीकरण झाले तरी २० टक्के जनावरे या आजाराने बाधित होऊ शकतात. त्यातच कोरोना विषाणूप्रमाणे लम्पी स्कीनचा विषाणू देखील नवनव्या ‘व्हेरिएंट’ मध्ये येऊन आजार पसरवीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लम्पी स्कीन ला कोणही हलक्यांत घेऊन चालणार नाही.

लम्पी स्कीन हा आजार आता काही नवीन राहिलेला नाही. पशुवैद्यकांबरोबरच बहुतांश पशुपालकही या आजाराबाबत जाणून आहेत. योग्य वेळी योग्य उपचार केल्यास हा आजार बरा होतो. असे असले तरी सध्या पावसाळा सुरु असून या काळात आजाराची लागण आणि प्रसार जनावरांमध्ये झपाट्याने होतो. त्यामुळे राज्यात प्रत्यक्ष लागण झालेल्या आणि आजाराची संभाव्य लक्षणे दाखवत असलेल्या विभाग, जिल्हानिहाय सर्व जनावरांची नोंद करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरु करायला हवेत. शिवाय या आजाराबाबत पशुपालकांमध्ये जाणीव जागृती वाढवायला हवी.

लम्पी स्कीन आजाराची लागण आणि प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांसाठी देखील मार्गदर्शक सूचना आहेत. त्या तत्काळ पशुपालकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. पशुपालकांनी देखील लम्पी स्कीन चा प्रादुर्भाव झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी घेतलेली काळजी अधिक बरी म्हणून प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यायला हवा. एवढे करूनही जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे दिसू लागताच बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्यावर शास्त्रशुद्ध उपचार सुरु करायला करावे. विषाणूजन्य आजारावर संबंधित रोगास प्रतिबंधक लसीकरणाची मात्राच प्रभावी ठरू शकते.

हे लक्षात घेऊनच पुण्यातील भारतीय पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेने (आयव्हीबीपी) लम्पी स्कीन रोग प्रतिबंधात्मक लस वर्ष २०२२ मध्येच निर्माण केली होती. या लसीच्या क्षमता तपासणी चाचण्या देखील घेण्यात आल्या, ज्या पूर्णपणे यशस्वी देखील ठरल्या आहेत. या लसीस भारतीय औषध महानियंत्रक संस्था नवी दिल्ली (डीसीजीआय) या संस्थेकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी होते. त्यामुळे ही लस फेब्रुवारी २०२५ पर्यंत राज्यात वितरित होणार होती. आता जुलै २०२५ मध्ये आपण असताना आणि राज्यात लम्पी स्कीनने पुन्हा डोके वर काढले असताना या लसीचे काय झाले, हेही स्पष्ट व्हायला हवे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Farmer Protest: ७/१२ कोरा करण्याच्या मागणीसाठी नागपूर-तुळजापूर महामार्ग ठप्प; शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र

Urea Shortage : सांगलीत युरियाची टंचाई

Crop Competition : खरीप पीक स्पर्धेत सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन

Eco Tourism : सातपुड्यात हिरवळ; पाल ‘इको टुरिझम’ला पसंती

SCROLL FOR NEXT