Nashik News: सप्टेंबर महिण्यातील अतिवृष्टीनेझालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांसाठीची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे. यात निफाड तालुक्यातील १३५ गांवातील ६४६३८ शेतकऱ्यांसाठी सुमारे ४७ कोटी ७१ लक्ष ६१ हजार मदत मिळणार असल्याची माहिती आमदार निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिली..निफाड तालुक्यात ६ मे पासून २७ सप्टेंबर २०२५ पर्यतच्या पावसाने निफाड तालुक्यातील १३५ गांवामध्ये अतिवृष्टी होऊन सोयाबीन, मका, भुईमुग, उडीद, मुग, तुर/बाजरी या कोरडवाहु पिकाचे ३ हेक्टरच्या मर्यादेत ४२८५३ शेतकऱ्यांचे २६५१३.२८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते..Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी.कांदा, टोमॅटो, ऊस, पपई, केळी, फुलपिके, रेशीम, भाजीपाला व इतर बागायत पिकांचे ३ हेक्टरच्या मर्यादेत ५०५३ शेतकऱ्यांचे २१३७.९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. तर द्राक्ष, डाळींब, ॲपल बोर, पेरु व इतर फळपिकांचे ३ हेक्टरच्या मर्यादेत १६७३२ शेतकऱ्यांचे ९५७५.७१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते..Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड.याप्रमाणे निफाड तालुक्यातीलसर्वच १३५ गांवामधील ६४ हजार ६३८ शेतकऱ्यांचे जिरायत, बागायत व फळपिक असे एकुण ३८२२६.९२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. निफाड तालुक्यातील सर्वच १३५ गांवामधील एकुण ६४६३८ बाधित शेतकऱ्यांच्या ३८ हजार २२६.९२ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणुन एकुण रुपये ४७ कोटी ७१ लक्ष ६१ हजार १६५ इतका निधी मंजूर झाला आहे..मदत थेट बँक खात्यात वितरितबाधित शेतकऱ्यांच्या विहित नमुन्यातील माहिती याद्या निफाड तहसील कार्यालयातून शासनाच्या संगणकीय प्रणालीवर भरण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात शासन मदत वितरीत करण्यात येणार आहे. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी शासन मदत बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरीत होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.