गुवाहाटी येथे स्पायसेस अँड क्युलिनरी हर्ब्स (CCSCH) कोडेक्स समितीचे आठवे अधिवेशन नुकतेच पार पडले२०२४ मध्ये जगातील मसाले उद्योगाची उलाढाल २८.५ अब्ज डॉलर्स एवढी होती हा उद्योग २०३३ पर्यंत ४१.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज .Spice Market: आसामच्या गुवाहाटी येथे स्पायसेस अँड क्युलिनरी हर्ब्स (CCSCH) कोडेक्स समितीचे आठवे अधिवेशन नुकतेच पार पडले. या माध्यमातून भारताने जागतिक मसाले क्षेत्रात आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. स्पायसेस बोर्डने आयोजित केलेल्या या अधिवेशनात २७ देशांतील सुमारे ८१ प्रतिनिधी सहभागी झाले होते. .भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) चे सीईओ रजित पुन्हानी यांनी सांगितले की, २०२४ मध्ये जगातील मसाले उद्योगाची उलाढाल २८.५ अब्ज डॉलर्स एवढी होती. हा उद्योग २०३३ पर्यंत ४१.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यांनी यावेळी बोलताना ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री आणि समतोल जागतिक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आधारित आणि सुसंगत अन्न मानकांच्या गरजेवर भर दिला..Spice Industry Success Story: पारंपरिक मसाल्यांचा तयार झाला ब्रॅण्ड.स्पायसेस बोर्डच्या सचिव पी. हेमलता यांनी, जागतिक अन्न व्यापारात प्रामाणिकपणा आणि सुरक्षितता राखण्यात कोडेक्स समिती महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. या फ्रेमवर्कमुळे उत्पादक, व्यापारी आणि ग्राहक या सर्वांनाच फायदा होईल. यामुळे मसाले उद्योगात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढेल, असे त्या म्हणाल्या..Spice Business: ‘रानातलं किचन’ समृद्धीचं कारण."व्यापारात सुरक्षितता आणि निष्पक्षतेची खात्री होण्यासाठीच नव्हे तर ग्राहकांचा विश्वास मजबूत करण्यासाठी आणि बाजारात प्रवेश मिळवण्यासाठीदेखील सुसंगत गुणवत्ता मानके आवश्यक आहेत," असे त्यांनी नमूद केले..भारताच्या पुढाकाराने २०१३ मध्ये कोडेक्स स्पायसेस अँड क्युलिनरी हर्ब्स समितीची स्थापना करण्यात आली होती. ही समिती अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि जगातिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या कोडेक्स एलिमेंटेरियस आयोगाच्या अंतर्गत काम करते. भारत, स्पायसेस बोर्डच्या माध्यमातून या समितीचे सचिवालय म्हणून कार्यरत आहे..आतापर्यंत, कोडेक्सने मिरी, हळद, जिरे, जायफळ, वेलदोडे आणि केशर यासह १६ मसाल्यांसाठी मानके निश्चित केली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मोठे वेलदोडे, दालचिनी आणि धणे यांच्यासाठी नवीन मानकांवर चर्चा करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.