Rain Update
Rain Update Agrowon
मुख्य बातम्या

Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम

Team Agrowon

पुणे : वायव्य भारतातील मॉन्सूनच्या परतीची सीमा शनिवारी (ता. १) कायम होती. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) विजांसह पाऊस (Rain) पडत आहे. आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा (Rain prediction) अंदाज कायम आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनच्या परतीची सीमा जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालियापर्यंत कायम आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात आज (ता. २) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, सोलापूर, नगर जिल्ह्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.


शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : पोलादपूर ६०, कुलाबा, खालापूर प्रत्येकी ५०, महाड ३०, रोहा, चिपळूण, खेड प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ११०, पुणे शहर ५०, सातारा, शिरोळ, चंदगड, पंढरपूर प्रत्येकी ३०, आजरा, कडेगाव, पिंपळगाव बसवंत, कवठेमहांकाळ, दिंडोरी, गडहिंग्लज, मिरज, कळवण, वडगाव मावळ, हातकणंगले, नाशिक प्रत्येकी २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT