Cotton Rate : पूर्वहंगामी कापूस पिकात दोनच वेचण्या होणार

अतिपावसाने विदर्भ व नंतर खानदेशात पूर्वहंगामी कापसाला फटका बसला. राज्यात सुमारे ४२ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. चीन, अमेरिका, ब्राझील या देशांपेक्षा अधिक ही लागवड आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः राज्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड (Cotton Cultivation) हवी तेवढी नाही. यातच यंदाही अतिपावसाने पूर्वहंगामी कापसाचे मातेरे (Cotton Crop Damage Due To Heavy rain) केले असून, दसरा, दिवाळी या काळात वातावरण कोरडे राहील्यास फक्त दोनच वेचण्या त्यात होतील. यामुळे राज्यातील कापूस उत्पादकता (Cotton Productivity) कमीच राहील, असेही दिसत आहे.

अतिपावसाने विदर्भ व नंतर खानदेशात पूर्वहंगामी कापसाला फटका बसला. राज्यात सुमारे ४२ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. चीन, अमेरिका, ब्राझील या देशांपेक्षा अधिक ही लागवड आहे. तसेच देशात सर्वाधिक लागवडही राज्यात झाली आहे. यंदा देशात सुमारे १२७ लाख हेक्टरवर कापूस पीक आहे.

यात राज्यातील कापसाखाली फक्त पाच ते सहा टक्के क्षेत्र ओलिताखाली असून, यातून चांगले उत्पादन अपेक्षित होते. यंदा राज्यात १०५ ते १०० लाख गाठींचे उत्पादन गृहीत धरले जात होते. पण अतिपावसाने पिकाची अतोनात हानी झाली. परिणामी उत्पादन व उत्पादकता घटेल. राज्यात एकरी तीन क्विंटल एवढेच कापूस उत्पादन हाती येते. २०११ मध्ये ही उत्पादकता अधिक होती. त्यात नंतर दुष्काळ, अतिपाऊस, गुलाबी बोंडअळीचा प्रकोप आदी कारणांमुळे सतत घट झाली आहे.

कापूस उद्योग, प्रक्रिया आदी क्षेत्रात कार्यरत संस्थांनी देशाचे व राज्याचे कापूस उत्पादन मागील हंगामाच्य तुलनेत वाढेल. देशात ३७५ व राज्यात किमान १०० लाख गाठींचे उत्पादन येईल, असे म्हटले आहे. परंतु हे अंदाज फोल ठरतील, अशी स्थिती यंदाही आहे.

Cotton Rate
Cotton Rate : कापड उत्पादन ८ टक्क्यांनी वाढले

फक्त दोनच वेचण्या शक्य

अतिपावसाने तीन वर्षे राज्यात थैमान घातले आहे. त्यात पूर्वहंगामी कापसाचे नुकसान अधिक झाले असून, यंदाही हे नुकसान दिसत आहे. पूर्वहंगामी कापूस पीक लाल, पिवळे झाले आहे. त्यात पाते, फुले नाहीत. फक्त लालसर कैऱ्या किंवा बोंडे आहेत. त्या उमलण्यासाठी सूर्यप्रकाश, हवेशीर वातावरण हवे आहे. पण रोज ढगाळ व पावसाळी वातावरण असते. वेचणीसाठी शेतकऱ्यांना जादा मजुरी द्यावी लागत आहे.

Cotton Rate
Cotton : चीनच्या स्वस्त सुताची कापूस उत्पादकांना धास्ती?

कारण पावसाच्या भितीने वेचणी उरकून घेण्यावर सर्वांचा भर आहे. यंदाही फक्त दोनच वेचण्या पूर्वहंगामी कापूस पिकात होतील. त्यासाठी दसरा ते दिवाळी या काळात कोरडे किंवा सूर्यप्रकाशीत वातावरण हवे आहे. वातारवरण खराब राहील्यास या दोन वेचण्यादेखील अशक्य होतील. तसेच पुढे दिवाळीनंतर गुलाबी बोंड अळीचा प्रकोपही वाढतो, असा अनुभव मागील तीन वर्षे राहीला आहे.

यंदाही गुलाबी बोंड अळी दिसत आहे. तिची समस्या नोव्हेंबरच्या मध्यात वाढेल. यामुळे कोरडवाहू कापूस पिकाचे अधिकचे नुकसान होईल. परिणामी, उत्पादनाचे अंदाज व अपेक्षित उत्पादकता याबाहतही हिरमोड होईल. तज्ज्ञांनुसार राज्यात यंदाही फक्त ८५ ते ८७ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) एवढेच उत्पादन हाती येईल. अर्थात, प्रतिहेक्टरी ३०० ते ३५० किलो रुई एवढीच उत्पादकता राहू शकते. परिणामी, देशाची उत्पादकता देखील कमी होईल,

अशीही माहिती मिळाली.

राज्यातील कापूस उत्पादनाची स्थिती (लाख गाठींमध्ये, एक गाठ १७० किलो रुई)

वर्ष सुरुवातीचा अंदाज हाती आलेले उत्पादन

२०१९ १०५ ९०

२०२० १०० ८५

२०२१ १०० ८५

२०२२ १०० ते १०५ अंदाज ८५ तज्ज्ञांचे भाकीत

राज्यात पूर्वहंगामी कापूस अतिपावसाने खराब झाला आहे. कोरडवाहू कापूस अनेक भागात अतिपावसाने वाढत नसल्याची स्थिती आहे. उत्पादन चांगले राहील, विक्रमी कापूस येईल, हे दावे सगळे हवेत आहेत. राज्यात फक्त ६० ते ६५ लाख गाठींचेच उत्पादन येईल, असे मी मानतो.
विजय जावंधिया, कापूस विषयाचे अभ्यासक तथा शेतकरी नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com