Maharashtra Agriculture : सांगली कृष्णा नदीवरील उपसाबंदी उठविण्यात आली असली, तरी कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांतील तलावांवरील उपसाबंदी कायम आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा संताप पुन्हा उफाळून आला असून, ‘कृष्णेवरील उपसाबंदी उठते, मग आमच्या तलावांवरील बंदी कधी उठणार?’ असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज असताना तलावांतील पाण्याचा उपसा बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे..सांगली पाटबंधारे विभागांतर्गत कृष्णा नदीवरील आटके (ता. कराड, जि. सातारा) ते को.प. बंधारा, डिग्रज (ता. मिरज) उजवा तीर, तसेच डिग्रज ते को.प. बंधारा, राजापूर (महाराष्ट्र राज्य हद्दीपर्यंत) या क्षेत्रात उपसाबंदी लागू करण्यात आली होती. तसेच मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील विभागांतर्गत सर्व तलाव, मोरणा नदी आणि तिच्यावरील को.प. बंधाऱ्यांच्या दोन्ही तीरांवरही उपसाबंदी लागू होती..Water Conservation : दुष्काळात नियम नको, पाणी अडवा.कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा नदीवरील उपसाबंदी शनिवार (ता. २६) पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ आणि जत तालुक्यातील २६ तलावांवरील उपसाबंदी कायम ठेवण्यात आली आहे..Krishna River: कृष्णेची पातळी खालावली; पिके जगवायची कशी?.त्यामुळे कृष्णा नदीवरील उपसाबंदी शिथिल केली असताना दुष्काळी तालुक्यांतील तलावांवरील बंदी का कायम ठेवली, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत..पुन्हा उपसाबंदी लागू होणार?कृष्णा नदीसह मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील तलाव तसेच मोरणा नदीवरील को.प. बंधाऱ्यांच्या दोन्ही तीरांवरील उपसाबंदी शनिवार (ता. २६) पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतर या भागात पुन्हा उपसाबंदी लागू होणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज असताना पुन्हा उपसाबंदी लागू झाल्यास उपलब्ध पाण्यातून पिके कशी जगवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.