Onion issue  Agrowon
मुख्य बातम्या

Onion issue : कांदाप्रश्नी दिल्लीतील बैठकीस बड्या नेत्याची गैरहजेरी ; निर्यात शुल्काबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार

Onion trader Strike :नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी १० दिवसांपासून लिलाव बंद ठेवले आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थित महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्यातील बड्या नेत्यांनी राज्यातील बड्या नेत्यांनी दांडी मारली.

Swapnil Shinde

Export Duty On Onion : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केले ४० टक्के निर्यात शुल्क हटवावे, नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत मार्केट आवारात कांद्याची विक्री करू नये, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री भारती पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. परंतु राज्यातील बड्या नेत्यांनी दांडी मारल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

टीकनाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा आज १० वा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समिती आणि उपसमितीमधील कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प आहे. त्यामुळे सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यास कांदा उत्पादक संघटनांनी पाठिंबा दिल्याने कांदा कोंडी झाली आहे. या प्रश्नावर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत दोन बैठका झाल्या. परंतू तोडगा निघाला नव्हता.

आज केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पणनमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय मंत्री डाॅ. भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्तार म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. व्यवहार ठप्प असल्याने कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून आणखी २ लाख टन कांदा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच कांदा निर्यात शुल्काबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली.

नेमक्या मागण्या काय?

  • १. कांदा निर्यातीवर केंद्राने लागू केलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे. २. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी करुन विक्री रेशन दुकानातून करण्यात यावी.

  • ३.कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या व्यापारावर सरसकट ५ टक्के सबसिडी आणि देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.

  • ४. बाजार समितीने आकारलेली मार्केट फीचा दर प्रति शेकडा १०० रुपयास १ रुपयाऐवजी १०० रुपयास ०.५० पैसे या दराने करण्यात यावा. आडतीचे दर संपूर्ण भारतात एकच असावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT