red pepper  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : लाल मिरचीला काय भाव मिळाला?

देशातील लाल मिरची उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे. यंदा महत्वाच्या लाल मिरची उत्पादक आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातील मिरची पिकालाही फटका बसला.

Anil Jadhao 

देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे शुक्रवारी काहिसे नरमले होते. वायदे ७९.६० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५७ हजार २८० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव स्थिर होते. कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता, कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनच्या वायद्यांमधील नरमाई कायम होती. सीबाॅटवरील वायदे शुक्रवारी १३.२३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४१२ डाॅलर प्रतिटनावर बंद झाले होते. देशातील बाजारातील बाजारातही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम होता. आज सोयाबीनला सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो. बाजारातील आवक सरासरी असल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढ उतार सुरु आहेत. त्याचा परिणाम आपल्या देशातील सोयाबीन बाजारावरही दिसून येत आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

देशातील लाल मिरची उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे. यंदा महत्वाच्या लाल मिरची उत्पादक आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातील मिरची पिकालाही फटका बसला. यामुळे या राज्यांमधील मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या लाल मिरचीला १८ हजार ते ३२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्रातील मिरची पट्ट्यातही सध्या भाव चांगले आहेत. यंदा दुष्काळामुळे यापुढील काळात मिरची उत्पादन घेणे शेतकरी टाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरचीच्या भावातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

उडदाचे भाव स्थिरावले आहेत. बाजारातील उडदाची आवक कमीच आहे. पण उडदाच्या भावात तेजी आल्यानंतर नफावसुलीसाठी उडदाची विक्री वाढली होती. त्यामुळे उत्पादन आणि पुरवठा कमी असला तरी उडदाचे भाव स्थिरावले होते. त्यातच काही प्रमाणात आयातही सुरु आहे. नव्या उडदाची आवक अनेक बाजारांमध्ये सुरु झाली. यामुळेही उडदाच्या भावातील तेजी थांबली आहे. सध्या उडदाचे भाव ८ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील उडीद उत्पादन गरजेपेक्षा कमीच राहिले. तसेच सणांच्या काळात उडदाच्या डाळिला चांगला उठाव राहू शकतो. त्यामुळे उडदाच्या दरातील तेजी कायम राहू शकते. तर रब्बीतील उत्पादनही कमीच राहण्याचा आहे. त्यामुळे तेजीला आधार असल्याचे बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

केळीच्या भावातही काहीशी नरमाई आली आहे. बाजारात केळीची आवक मर्यादीत आहे. कमी दर्जाच्या केळीला राज्यात सध्या १२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर दर्जेदार केळीस २ हजार रुपये भाव आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही केळीची आवक कमीच आहे. त्यामुळे केळीचे भाव टिकून आहेत. राज्यातील केळीला केळीलाही चांगला उठाव आहे. कमी आवकेमुळे केळीचे भाव टिकून आहेत. राज्यातही केळीला चांगला उठाव आहे. त्यामुळे भाव सुधारु शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: राज्यात ४ दिवस पावसाची उघडीप राहणार; शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Weekly Weather: बहुतांश जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता

Samruddha Panchayat Raj : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये अकोल्याने लौकिक वाढवावा

Dairy Farming: दुधातील फॅट, एसएनएफवर परिणाम करणारे घटक

Crop Damage : शेतकऱ्यांचा दलदलीशी होतोय सामना

SCROLL FOR NEXT