डॉ. केशव देशमुखFarming Rural Life: धरित्री ही अन्नदात्रीच. अन्नपाणी देणारी शेती ही गावशिवारामध्ये निरंतर जनलोकात वंदनीयच राहिली. वावरात पिकणारे सारे हंगाम आणि वावरातल्या धनधान्यांनी भरणारी ग्रामविश्वातील घरे म्हणजे धनलक्ष्मी. विशाल अर्थाने समृद्धी प्रदान करणारी धान्यलक्ष्मीही. दिवाळीत परंपरंच्या धारेने आणि सामाजिक धारणेने भरघोस धान्याची पूजा, लाडक्या गाय वासरांची पूजा, जनावरांची स्थाने बनलेल्या गोठ्याची पूजा आणि त्यासोबतच दूधदूभते देणाऱ्या पाळीव प्राण्यांची फुलमाळा घालून सजवत आनंदेभरीन होणारी पूजा दिवाळी सणात बहारच आणणारी असते. यानिमित्त गुरांवासराच्या शेणाने घरोघरी अर्थात गोठागोठी पाच पांडवांची सजूनधजून दिवाळीला पूजा मांडण्याचा गावातला प्रघात मोठा उल्हास प्रकट करणारा असा चैतन्यमयी असतो. या अशा अस्सल देशी उत्सवात मूलतः खेड्यातील महिलांचा सानंद जो एक सहभाग असतो, तो अद्भूत म्हणावा लागेल. .दिवाळीचा मानशेतीला धरून असलेली ही दिवाळी, मातीला वंदन करणारी दिवाळी असते. सोबतच धनाचे, जित्राबाचे पूजन करणारीही नावानं देणारी दिवाळी खेड्यांच्या आनंदाचे एकप्रकारे निधान झालेली असते. मातीचे ममत्व, भूमीचे मांगल्य, गावाचा आनंद आणि गावमाणसांच्या एकूण सुखाचा सोहळा म्हणून आनंदाला तोटा नसलेला हा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. घरोघरी ठळक होत गेलेली सामूहिकता, यजमान आणि सोयरे यांच्या गाठीभेटी, जणू आठवडाभर गोडधोड खाण्याची चंगळ आणि दरमानसी नवे कपडे परिधान करण्याची शोभिवंत रीत या सर्व ऐवजाने ग्रामीण भागात दिवाळी बहरलेली असते. .Agricultural Culture: शेती पद्धती बदलण्याची तीव्र निकड.शिवाय, सुगंधित झालेली असते.शेतीचा लळा, मातीचा टिळा आणि गावाचा सोहळा म्हणून शेतीसंस्कृतीमध्ये दिवाळीचा मान खचितच मोठा आहे. अन्नपाणी देणारी शेती नवी मराठी भाषाही पिकवते.आपली कृषी परंपरा समृद्ध आहे,हे निराळे सांगावे लागत नाही. मराठी ग्रामीण साहित्याने जसे कृषी परंपरेचे सकल दर्शन घडविले तसेच भाषा म्हणून मराठीचे नवदर्शनही घडविले आहे. शेती हे अतिशय भव्य, उपयुक्त, भाकर, चारा, पाणी देणारे अन्नपूर्णा म्हणूयात असे क्षेत्र आहे. या क्षेत्राने जसे जग जगविले तशी भाषाही जगविलेली आहे..परंपरेच्या धाटीतून,काळाच्या पोटातून, लोकांच्या बोलाचालीतून भाषेचे वाहाणे निरंतर वाहाणे राहिलेले आहे, आणि यासंबंधीचे सूक्ष्म बारकावे आपणास बोलीभूगोलातून (डायलेक्ट जिऑग्राफी) शिवाय बोलीविज्ञानातून (डायलेक्टाॅलाॅजी) मधून साधार शोधायला सहाय्य होते. पुण्याच्या डेक्कन संस्थेत यासंबंधाने संग्रहमूलक आणि खोल शोधायला मोठे काम पहायला मिळते. तथापि, ही स्थिती अन्य कुठल्या महाविद्यालयात मात्र आढळून येत नाही. आपल्या एकुणातच शाळा तर भाषिक अभ्यासापासून अजूनही कोसो दूर आहेत. त्यामुळे या भाषिक दुर्लक्षितपणाबद्दल जरा बारकाईने विचार करायला हवा.शेतीने पिकविली भाषाहीसतत पीक काढणारी आपली शेती भाषाही उत्तम पिकविते. आमची माती, आमची माणसं हे जेवढे खरे तेवढेच शेती, माती, माणसं आणि भाषा हे त्यापेक्षाही खरे. शेती आणि श्रम हा विषय एकरूप आहे. या शेतीला जोडून आणि या श्रमाला विचारात घेत मराठी भाषेत अगदी क्रांतिकारक अशी नवी शब्दकळा (डिक्शन) जन्माला आलेली आहे. जी शब्दकळा आमच्या समकालीन शिक्षणापासून आणि नागरी हवेपासून पुष्कळ दूर आहे. त्यामुळे, “मुलांनी शाळांकडे जाण्यापेक्षा शाळांनी मुलांकडे जायला हवे.” .हा ग्राम-बोलीच्या अनुरोधाने उपस्थित केलेला डाॅ. गणेश देवी यांचा मुद्दा पुरेसा यथार्थ ठरतो. याचे कारण घर आणि शेती यांच्या कक्षेतील असंख्य कितीतरी नवनवीन अस्सल आणि अर्थसार भरलेले शब्द मुलांना ठाऊक असतात. या शब्दांबाबत त्यांचे मैत्र जडलेले असते. हा सगळा भाग मात्र ते शिकत असलेल्या पुस्तकात गायब असतो. अशाने मग, भाषिक-शैक्षणिक पहाट होणारच कशी? म्हणूनच शेतीने भाषाही उत्तम पिकवली आहे, असे म्हणता येते..Diwali Traditions: दिवाळीतल्या गवळणी.शेती ही बोली- तीर्थक्षेत्र म्हटले पाहिजे. शेतीशी एकरूप असलेल्या या नव्या शब्दकळेचे काही भाषिक नमुने जरूर पाहण्यासारखे आहेत. त्याअनुषंगाने ही काही उदाहरणे...ज्या त्या मूळ शब्दाचा अर्थ कंसात नोंदविलेला आहे.जसे :आबक (सर्वात आधी केलेली पेरणी), मेर ( गायी, बैलांना चारा-पाण्यासाठी राखीव ठेवलेले खास चराईक्षेत्र), वळाण्या (भरपूर पाऊस झाल्यावर शेतात अवजारे चालवता येत नाहीत. अशावेळी शेतीच्या मशागतीस शेतात अनुकूल स्थिती निर्माण होणे = वळाण्या), गंजी (गवताच्या पेढ्यांचा रचलेला सुंदर भव्य ढीग), सुडी(ज्वारीच्या धाटाच्या पेढ्यांचा रचलेला सुंदर भव्य ढीग), माकूल (एखादी गोष्ट,वस्तु पुष्कळ असणे), कठान(रब्बी पिकांची पेरणीचा शेतातला मुलूख. .जसे गहू,हरभरा,करडी,वाटाणा पीकं ), भडोळ्या (शेतजमिनीला खोलच खोल पडलेल्या भेगा वा भोके ),डिवरा(अपवादात्मक एखादा मारकुटा बैल), बखाड (अवर्षणग्रस्त दुष्काळीचित्र वा तशी स्थिती ), कुपाटा (शेतीचे पीक रक्षण करायला केलेले काटेरी प्रतिबंधक कुंपण), झोपाटा(रानात उभ्या केलेल्या निवाऱ्याला गवत, झाडपाला, लाकूड वापरुन केलेला चौकोनी देशी दरवाजा), बिनगी (मूलतः शेतामधी पिण्याचे पाणी साठविण्याची खापराची घागर), भुरकी (कोरडी तिखट मिरच्यांची चटणी), रानसावडी, डवरे, दुंडे, वखोर (शेतीच्या मशागतीसाठी वापरली जाणारी ही लाकडी वेगवेगळी अवजारे), चाव्हर (एकामागे एक असे दोन चार, बैलजोड्या लोखंडी नांगराला जुंपून रानाची मशागत करावयाची रीत ), .कदोर (कंटाळा), शिवळा-बेलड्या (कामाला बैल जुंपण्यात बैलांच्या गळ्याभोवती बांधायला पट्टा आणि मानेच्या) बाजूला (जूवात) आडव्या लाकडात अडकविण्याचे दोन लोखंडी खुंटे=शिवळा), डालगे (शेतातील मालाची वाहतूक करण्यासाठी वापरला जाणारा मोठा टोपला), दाताळे (अनेक लाकडी मोठे दात असलेले फावडे), वारती (चामड्याचा मजबूत लांब दोर), धांद (अंबाडी, वाख, ताग, किंवा नायलाॅन यापासून बनवलेला मजबूत लांब दोर), चरहाट (पाळीव जनावरे सोडबांध करण्यासाठी गळ्यात अडकविण्याचा लहान दोर), दडपा (विशेषतः बैलगाडीत बसण्यासाठी अंथरलेली गवताची गादी वा आच्छादन), घोंगटा (पावसापासून बचाव करण्यासाठी पानांचा/गोनपाटाचा बनवलेला संरक्षक टोप). ह्या अशा विपुल शब्दांनी शेतीपरंपरेने मराठीला भाषिक संपन्न ऐवज पुरवलेला आहे. कृषी परंपरा ही बोलीभाषेचीही एक विलक्षण मोठी परंपरा आहे. यामध्ये भूगोल, जन, जनरीत, श्रमिक रूपे, श्रद्धा आणि लोकभाव यांचा अर्थातच मोठा असा वाटा आहे.९४२२७२१६३१(लेखक ज्येष्ठ भाषा अभ्यासक असून महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.