Rural Business: राजस्थानातील हल्दीघाटी परिसर ऐतिहासिक, नैसर्गिक व सांस्कृतिकदृष्ट्या जगप्रसिद्ध आहे. गुलाब शेतीसाठीही हा परिसर प्रसिद्ध आहे. येथील शंभरहून अधिक शेतकरी गुलाबावर प्रक्रिया करून त्यापासून गुलाबजल, गुलकंद, अत्तर, सरबते आदी उत्पादनांची निर्मिती करतात.