Agrowon Podcast : मक्याचा बाजार वाढेल की स्थिर राहील?

Market Bulletin : सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात. पण भावात जास्त नरमाई येणार नाही, असा अंदाज आहे.
Market Bulletin
Market BulletinAgrowon

आज, शुक्रवार. म्हणजेच आठवड्याचा बाजाराचा शेवटचा दिवस. वायदे शनिवारी आणि रविवारी बंद असतो. त्यामुळे शुक्रवारी दरात मोठे चढ उतार होतात. आजही तसेच दिसत आहे. आज दुपारपर्यंत सोयापेंड आणि सोयाबीनचे वायदे एक टक्क्याने नरमले होते. सोयाबीनचे वायदे १३.२८ डाॅलवर आले होते. तर सोयापेंडचे वायदे ४१९ डाॅलरवरपर्यंत कमी झाले होते. याचा परिणाम देशातील बाजारातही दिसून आला. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५० ते १०० रुपयांनी कमी झाले. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपयांवर आले होते. तर बाजार समत्यांमध्ये भाव ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात. पण भावात जास्त नरमाई येणार नाही, असा अंदाज आहे.

Market Bulletin
Agrowon Podcast : हळदीला बाजारात काय भाव मिळतोय?

आज देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई दिसून आली. इन्टरकाॅन्टीनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर कापसाचे वायदे ७९.८१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर काॅटलूक ए इंडेक्स ८९.७० सेंट प्रतिपाऊंडवर होता. देशातील वायदे म्हणजे एमसीएक्सवर कापूस खंडीमागे १६० रुपयांनी नरमले होते. खंडीचे व्यवहार दुपारपर्यंत ५७ हजार ४० रुपयांवर झाले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांवर होते. बाजारातील आवक पावसामुळे काहिशी कमी झालेली दिसते. कापसाची बाजारातील आवक आणि इतर घटक विचारात घेता कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोचे भाव दोन दिवसांपासून काहीसे स्थिरावले आहेत. तर उठाम मात्र चांगला आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोच्या भावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला. पण  पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच नव्या लाववडी पाणी टंचाई आणि वाढत्या तापमानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे. परिणामी भावातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : मक्याचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो?

मक्याचे भाव मागील चार दिवसांपासून स्थिरावले आहेत. मक्याचे उत्पादन कमी झाल्याने आवक सराससरीपेक्षा कमीच होत आहे. सध्या मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा दुष्काळी स्थितीचा फटका इतर पिकांप्रमाणे मका पिकालाही बसत आहे. रब्बीतील पीकही दुष्काळाच्या तडाख्यात सापडू शकते. त्यामुळे रब्बीतील उत्पादनाविषयी चिंता कायम आहे. तसेच मक्याला सध्या मागणी चांगली येत आहे. पण इतर धान्य पिकांच्या दरानुसार आणि पशुखाद्याच्या मागणीनुसार मक्याचे भाव बदलू शकतात. बाजारातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर मक्याचा बाजारही सुधरू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

आल्याच्या भावात मागल काही दिवसांपासून नरमाई आली. आल्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झाला होता. तसेच नवा माल बाजारात पुढील एक ते दीड महिन्यात सुरु होईल. नवा माल बाजारात येण्याच्या आत मागील माल विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच नफावसुलीसाठी आल्याची विक्री झाली. त्यामुळे आल्याचे भाव आता ७ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आले. यंदा नव्या आले पिकाला कमी पावसाचा फटका बसला. तसेच बदलत्या वातावरणाचाही फटका आले पिकाला बसत आहे. परिणामी आल्याचे उत्पादन यंदाही कमी राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com