Agriculture University Leadership Matters: मागील काही वर्षांपासून शिक्षण, संशोधन असो की विस्तार या तिन्ही पातळ्यांवर कृषी विद्यापीठांची कामगिरी खालावली आहे. कुलगुरू निवडीत वाढता राजकीय हस्तक्षेप, त्यातून निकषांत होत असलेल्या वारंवार बदलांमुळे अपेक्षित अनुभव आणि पात्रतेच्या उमेदवारांची निवड या पदावर होताना दिसत नाही. शिवाय काही अपवाद वगळता कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रिया ह्या नेहमी वादग्रस्तच ठरत आल्या आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला एक तर विलंब झाला आहे. .कुलगुरूंचा कार्यकाळ संपत आला असतानाच नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असते. असे असताना या कृषी विद्यापीठाचे कुलगुरुपद मागील नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय कुलगुरू शोध समितीने पात्र उमेदवारांना डावलून अन्य १२ जणांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आल्याने डावलण्यात आलेल्या उमेदवारांनी थेट न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे..Agricultural Universities Recruitments: कृषी विद्यापीठांत प्राध्यापक, शिक्षकेतर पदभरती लवकरच.गंभीर बाब म्हणजे डावलेले उमेदवार ‘आयसीएआर’मधून आलेले असून ते निकषांत बसतात तर संभाव्य यादीत काही अत्यंत सुमार दर्जाचे, काहींवर सेवाकाळात विविध प्रकरणांत चौकशा सुरू असलेले तर काहींनी नाव आणि वयात फेरफार केलेले उमेदवार आहेत. त्यामुळे माजी कुलगुरूंनी शोध समितीच्या उद्देशावरच संशय घेतला असून तो दूर व्हायला हवा..कुलगुरू पद हे मान-सन्मान, प्रतिष्ठेचे आहे. त्याचबरोबर या पदावर कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार अशा तिन्ही आघाड्यांवर विद्यापीठाने उल्लेखनीय काम करण्याची जबाबदारी पण आहे. या पदावरील व्यक्तीस विद्यापीठांतर्गत विविध मंडळे, परिषदा यातील तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम राबविण्याचा अनुभवही हवा. याबाबतचे ज्ञान आणि कौशल्य प्रदीर्घ अनुभवातूनच प्राप्त होते. त्यामुळे कुलगुरुपदासाठी विद्वत्ता, पात्रता, अनुभव आणि अष्टपैलू नेतृत्व यांच्या निकषांत तडजोड करून चालणार नाही..Agriculture University: कृषी विद्यापीठांचा फजितवाडा.या सर्व बाबी विचारात घेऊन शोध समिती तसेच राज्यपालांनी निकषांनुसार खरोखरच पात्र उमेदवारांची कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुपदी निवड करायला हवी. कृषी विद्यापीठांमध्ये ५० टक्केहून अधिक पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. पदभरतीबरोबर पदोन्नत्याही रखडलेल्या आहेत. विभागप्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, अधिष्ठाता, संशोधन संचालक व विस्तार शिक्षण संचालक या पदांवर महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेने नियमित नियुक्त्याच केलेल्या नसल्याने कामकाजावर तर परिणाम होतच आहे परंतु कुलगुरू पदासाठीच्या पात्रतेच्या निकषांत मराठी उमेदवार बसत नसल्याने त्यांची संधी हुकत आहे..कुलगुरूंच्या न्यूनतम पात्रतेमध्ये संबंधित उमेदवार अथवा शास्त्रज्ञ मराठी समजणारा असावा, असा उल्लेख कुठेही जरी नसला, तरी या पदाच्या व्यक्तीला शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी कमीत कमी मराठी भाषेचे ज्ञान असावे असा संकेत आहे. या संकेताचे कुलगुरू निवड करताना पालन होईल, हेही पाहायला हवे. कुलगुरू निवड प्रक्रियेत प्रत्येक वेळी निकषांमध्ये घोळ घातला जातो..निवड प्रक्रियेला विलंब होतो. या प्रक्रियेत निकषांनुसार पात्र उमेदवार डावलले जातात, त्यात पारदर्शकता कुठेही दिसत नाही. कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ नवी दिल्ली ही संस्था कृषी शास्त्रज्ञांची निवड करते. कुलगुरू सक्षम उपमहासंचालकाचे पद देखील ही संस्था निवडते, परंतु त्यासाठी एक गुणसूत्राचा आधार घेऊन गुणदर्शनानुसार निवड होते. ही प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपाविना, पूर्णपणे पारदर्शी असते. कुलगुरू निवड प्रक्रियेत असा काही बदल करता येईल का, यावरही विचार होणे आता गरजेचे झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.