Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market Rate : कापसाला देशभरात काय भाव मिळतोय? कापसाचे भाव वाढतील का?

Market Update : देशभरात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर कापसाची आवक हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशभरात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर कापसाची आवक हंगामातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. तर दुसरीकडे सरकीचे भाव आज टिकून होते. सरकीला आज ३ हजार १०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सरकी भावाचा आधार कापूस भावाला आहे.

देशातील बाजारात सध्या कापसाची आवक शिगेला पोचली. देशभरात आज कापसाची २ लाख १६ हजार गाठींची आवक झाली होती. आठवड्यात सोमवार ते शुक्रवार कापसाची आवक २ लाख गाठींपेक्षा जास्तच दिसत आहे. तर शनिवारी आणि रविवारी अनेक बाजार बंद राहत असल्याने आवक कमी दिसते. मात्र आठवड्याची सरासरी आवक ही कायम आहे.

आवकेचा विचार करता आज देशभरात २ लाख १६ हजार गाठी कापूस आला होता. तेलंगणात सर्वाधिक ६१ हजार ७०० गाठी कापसाची आवक झाली होती. तेलंगणातील आवक ही गेल्या आठवड्यापासून कायम दिसत आहे. तर महाराष्ट्रात ४६ हजार ७०० गाठी आवक झाली होती. महाराष्ट्रातील आवक ४० हजार ते ५० हजार गाठींच्या दरम्यान गेल्या दोन आठवड्यापासून दिसत आहे. गुजरातमध्येही ३० हजार ३०० गाठी कापूस विक्रीसाठी आला होता.

उत्तर भारतात म्हणजेच पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील आवक २१ हजार गाठींवर होती. उत्तर भारतातील आवक काहिशी कमी झालेली आहे. तर मध्य प्रदेशात २१ हजार २०० गाठींची आवक झाली होती. तसेच कर्नाटकमधील आवक २० हजार ७०० गाठी एवढी होती. आंध्र प्रदेशात ८ हजार ७००, ओडिशात १ हजार ८०० आणि तमिळनाडूत ५०० गाठी कापूस आज बाजारात आला होता.

राज्यनिहाय कापूस बाजारभाव

महाराष्ट्र…६,९०० ते ७,३००

गुजरात…६,९०० ते ७,५००

तेलंगणा…६,७०० ते ७,२००

उत्तर भारत…६,७०० ते ७,५००

कर्नाटक…६,८०० ते ७, ४००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT