Potato Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Potato Prices : पश्चिम बंगालची राज्याबाहेर बटाटा पाठविण्यावर बंदी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Anil Jadhao 

Pune News : पश्चिम बंगाल सरकारने मागच्या महिन्यात इतर राज्यांमध्ये बटाटा पाठविण्यावर बंदी घातली होती. ही बंदी कायम ठेवण्याची शक्यता दिसत असल्याने व्यापारी आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारने ही बंदी कायम ठेवली तर पश्चिम बंगालचे इतर राज्यातील बटाटा मार्केट हातचे जाईल आणि याचा फटका शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनाही बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आंदोलनाचाही इशाराही दिला आहे. 

देशात बटाट्याचे उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले होते. भाव वाढल्याने पश्चिम बंगाल सरकारने मागच्या महिन्यात इतर राज्यांमध्ये बटाटा पाठविण्यावर बंदी घतली होती. देशात बटाटा पुरवठ्यात पश्चिम बंगाल खूपच महत्वाचे राज्य आहे. उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होत असते. त्यामुळे इतर राज्येही बटाट्यासाठी पश्चिम बंगालवर अवलंबून आहेत. पण पश्चिम बंगालने इतर राज्यांमध्ये बटाटा पाठविण्यावर बंदी घातल्याने या राज्यांनाही काही प्रमाणात बटाटाची टंचाई जाणवत आहे. 

पश्चिम बंगाल सरकार राज्याबाहेर बटाटा पाठविण्यावरील बंदी कायम ठेवल्यास उत्तर प्रदेशला याचा फायदा होईल. पश्चिम बंगालचे मार्केट उत्तर प्रेदश काबीज करू शकते. ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार आणि आसाम ही राज्ये बटाट्यासाठी पश्चिम बंगालवर अवलंबून आहेत. पण आता बंगालबाहेर बटाटा जात नसल्याने ही राज्ये उत्तर प्रदेशकडून बटाटा घेत आहेत. हे असेच सुरु राहीले, पश्चिम बंगालचे हातेच मार्केट जाईल, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत. 

मुबलक पुरवठा

दरवर्षी पश्चिम बंगाल इतर राज्यांमध्ये २० ते २५ लाख टन बटाटा पाठवत असतो. राज्याची गरज पूर्ण होऊन हा बटाटा जात असतो. येथील व्यापाऱ्यांनी सांगितले की, ऑगस्टच्या सुरुवातील राज्यातील शीतगृहांमध्ये जवळपास ४० लाख टन बटाटा होता. पश्चिम बंगला राज्याला ऑगस्ट ते डिसेंबर या काळात २१ लाख टन बटाटा लागतो. नव्या लागवडीसाठी बियाणे म्हणून ४ लाख टन बाजुला काढला तरी आणखी १५ लाख टन अतिरिक्त बटाटा राज्यात उपलब्ध आहे, असे येथील शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. हा बटाटा बाहेर गेला नाही तर मोठे नुकसान होणार आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT