Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Demand: लग्नसराई, उत्सवांमुळे फुलांना मागणी कायम

Flower Market Update: व्हॅलेंटाइन-डेच्या पार्श्वभूमीवर गुलाबाची मागणी चांगली राहिल्यानंतरही फुलबाजार तेजीत आहे. लग्नसराई, उत्सव व समारंभांमुळे झेंडू, गुलाब, मोगऱ्यांना मोठी मागणी असून, दर टिकून आहेत. शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News: व्हॅलेंटाइन-डेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात गुलाबाची मागणी चांगली राहिली. आता फुलांची आवक वाढली असून, त्यांना लग्नसराईसह उत्सव, समारंभांसाठी उठाव असल्याने दरही टिकून आहेत. झेंडू, लिली, मोगरा गुलाबाच्या फुलांची मोठी मागणी सध्या आहे.

मागील शुक्रवारी (ता. १४) व्हॅलेंटाइन डे होता. या कालावधीत गुलाबाच्या फुलांना मागणी होती. परंतु ही मागणी अजूनही कायम आहे. कारण लग्नसमारंभ, साखरपुडे, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, उत्सवांसाठी फुलांना उठाव आहे. फुलांची आवक जळगाव तालुक्यातील शिरसोली, आसोदा, भुसावळातील विविध गावांतून होत आहे.

जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील फुलबाजारात फुलांची आवक टिकून आहे. झेंडू, गुलाब यांची आवक अधिक आहे. जरबेराचा पुरवठा पुणे, नगर भागांतून अडतदार, खरेदीदार करून घेत आहेत. कारण स्थानिक क्षेत्रात जरबेरा लागवड कमी आहे.

अनेक शेतकऱ्यांनी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्‍वभूमीवर गुलाब फुलांची काढणी व अन्य व्यवस्थापन केले होते. त्यांना दर चांगले मिळाले. परंतु या आठवड्यातही फुलांची आवक व मागणी वाढली आहे. आवक वाढली, पण दरही टिकून आहेत. दर्जेदार फुलांची आवक बाजारात होत आहे. कारण सध्या वातावरण नीरभ्र आहे.

दर टिकून असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसाही राहत आहे. काही शेतकरी थेट किरकोळ खरेदीदारांना गुलाबाची पाठवणूक जळगाव, चाळीसगाव व भुसावळ आदी शहरांत करीत आहेत. काही शेतकरी थेट ग्राहकांना आठ ते नऊ रुपये प्रति नग या दरात गुलाब फुलांची विक्री करीत आहेत.

मोगरा फुलांचे दर ५०० ते ६०० रुपये

शेतकऱ्यांकडून सरासरी पाच ते सात रुपये प्रति नग या दरात गुलाब फुलांची खरेदी केली जात आहे. झेंडूचे दरही ३० ते ३५ रुपये प्रति किलो, असे आहेत. मोगरा फुलांचे दर ५०० ते ६०० रुपये प्रति किलोपेक्षा अधिक आहेत. फुलांची पाठवणूक काही अडतदार नागपूर, अमरावती, गुजरातमधील सुरत, अहमदाबाद, बडोदा व राज्यात अन्य भागांत करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT