Flower Market: व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब आवकेत वाढ

Valentine Demand on Flower: व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली आहे. उठाव असल्याने दरही टिकून आहेत. शुक्रवारी (ता.१०) जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव व अन्य शहरांतील बाजारात गुलाबाच्या फुलांची मोठी मागणी होती.
Rose Flower
Rose FlowerAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली आहे. उठाव असल्याने दरही टिकून आहेत. शुक्रवारी (ता.१०) जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव व अन्य शहरांतील बाजारात गुलाबाच्या फुलांची मोठी मागणी होती.

येत्या शुक्रवारी (ता.१४) व्हॅलेंटाईन डे आहे. त्यासंबंधी फुलांची मागणी बाजारात मागील बुधवारीच (ता.७) सुरू झाली. फुलांची आवक जळगाव तालुक्यातील शिरसोली, आसोदा, भुसावळातील विविध गावांतून होत आहे. जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील फूल बाजारात मागील दोन-तीन दिवस प्रतिदिन सरासरी २५ हजार नग गुलाब फुलांची आवक झाली आहे.

Rose Flower
Flower Market : रत्नागिरीत फुलांची आवक घटली

गुलाब फुलांचे दर नोव्हेंबरमध्ये प्रतिनग दोन ते तीन आणि कमाल पाच रुपये, असे होते. डिसेंबरमध्ये दर सरासरी दोन रुपये प्रतिनग असे मिळाले. जानेवारीत लग्नसराईमुळे दर प्रतिनग तीन ते पाच रुपये, असे काही दिवस मिळाले. परंतु या काळात आवकही मर्यादीत किंवा कमी होती.

अनेक शेतकऱ्यांनी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाब फुलांची काढणी व अन्य व्यवस्थापन केले. यामुळे आवक या आठवड्यातच वाढली आहे. आवक वाढली, पण दरही टिकून आहेत. शेतकऱ्यांकडून सरासरी पाच ते सात रुपये प्रतिनग व सरासरी पाच रुपये प्रतिनग या दरात गुलाब फुलांची खरेदी केली जात आहे.

Rose Flower
Flower Farming : फ्लॉवरचे आंतरपीक ठरतेय फायद्याचे...

गुलाब फुलांची पाठवणूक काही अडतदार नागपूर, अमरावती, गुजरातमधील सूरत, अहमदाबाद, बडोदा तसेच राज्यातील अन्य भागांत करीत आहेत. दर्जेदार गुलाब फुलांची आवक बाजारात होत आहे. त्यांचे दर टिकून असल्याने शेतकऱ्यांचा जानेवारीत झालेला तोटा किंवा कमी नफा भरून निघण्यासही मदत होत आहे. काही शेतकरी थेट किरकोळ खरेदीदारांना गुलाबाची पाठवणूक जळगाव, चाळीसगाव व भुसावळ आदी शहरांत करीत असून, त्यात आठ ते नऊ रुपये प्रतिनग असाही दर मिळत आहे.

वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील अडतदारांनीदेखील गुलाब फुलांच्या पाकळ्या निर्मिती, हार, गुच्छ निर्मिती सुरू केली आहे. खरेदीदारांकडून आगाऊ नोंदणी होत असून, त्यासंबंधीची कार्यवाही या व्यापारी संकुलात सध्या वेगात सुरू आहे, अशी माहितीही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com