Agriculture Technology: भारताला जनुकीयदृष्या सुधारित (GM) आणि जनुकीय संपादित या दोन्ही तंत्रज्ञानाची गरज आहे. पण अशा कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाला मंजुरी देताना हे विचारात घेतले पाहिजे की त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल?, असे मत प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अॅण्ड फार्मर्स राइट्स अथॉरिटीचे अध्यक्ष आणि आयसीएआरचे माजी महासंचालक टी. मोहापात्रा यांनी व्यक्त केले आहे..नवी दिल्लीत वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या डायलॉग नेक्स्ट या कार्यक्रमात संबोधित करताना ते बोलत होते..GM Maize Variety: पंजाब कृषी विद्यापीठात जीएम मक्याच्या चाचण्या.मोहापात्रा पुढे म्हणाले की, कृषी शास्त्रज्ञांनी अशाप्रकारचे कोणतेही संशोधन हाती घेण्यापूर्वी पहिल्यांदा शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा. जेणेकरून अशा संशोधनाचा उद्देश काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होईल? हे समजून घेता येईल..त्यानंतर ‘बिझनेसलाइन’शी बोलताना, मोहापात्रा यांनी स्पष्ट केले की “GM आणि जनुकीय संपादित हे दोन्हीही अत्यंत शक्तिशाली असे तंत्रज्ञान आहेत. जेव्हा वनस्पतीत जनुकीय नसते, तेव्हा ते इतर कुठूनही घेऊन त्या वनस्पतीत सोडता येतो, ज्यामुळे त्याचा अपेक्षित गुणधर्म दिसून येतो. GM पद्धतीच्या तुलनेत, जनुकीय संपादन तेव्हाच काम करते जेव्हा त्या वनस्पतीमध्ये संबंधित जनुकीय आधीपासूनच अस्तित्वात असते. पण तो कार्यक्षम नसते. अशावेळी त्यात दुरुस्ती करता येतो आणि त्यासाठी जनुकीय संपादन ही सर्वोत्तम पद्धत मानली जाते. हे एक जनुच्या अनुक्रमात बदल करण्यासाठीचे एक लक्षित (targeted) तंत्र आहे.".GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी.त्यांनी हेही सांगितले की, ट्रान्सजेनिक पद्धतीने जे काही करता येते, ते सर्व जनुकीय संपादित माध्यमातूनही करता येऊ शकते, कारण त्यामध्ये दुसऱ्या एखाद्या अन्नयोग्य पिकामधील अस्तित्वात असलेला जनुकीय वापरता येतो. आपण आज पाहात आहोत की अमर्यादित तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पना येत आहेत,” असेही त्यांनी सांगितले..जनुकीय संपादनाचा फायदा काय? जनुकीय संपादनाद्वारे, इतर तंत्रज्ञानाचा वापर करून (एसडीएन १ आणि एसडीएन २ व्यतिरिक्त), अस्तित्वात असलेल्या जीनची जागा चांगले जीन घेऊ शकते. जनुकीय संपादनाद्वारे नवीन जीनदेखील सादर करता येते, असेही ते म्हणाले..सरकारने अलीकडेच अधिक उत्पादन देण्याची क्षमता असलेल्या दोन जनुकीय संपादित धान वाणांना मंजुरी दिली आहे. पण हे वाण अद्याप व्यावसायिक लागवडीसाठी जारी करण्यात आलेले नाही..दरम्यान, भारत सरकारच्या "लॅब टू लँड" कार्यक्रमाशी सुसंगत "टेक इट टू द फार्मर" या विषयावरील डायलॉग नेक्स्ट २०२५ मध्ये संबोधित करताना, CIMMYT आणि बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साउथ एशियाचे महासंचालक ब्रॅम गोव्हर्ट्स म्हणाले की, भारताचा कृषी क्षेत्रातील पुढाकार आणि नवकल्पना ह्या कृषी-अन्न मूल्य साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर उत्पादकता, शाश्वतता आणि सर्वसमावेशतकता वाढवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.."उदयोन्मुख ग्लोबल मेगा ट्रेंड कृषी-अन्न प्रणालींसाठी आव्हाने ठरत आहेत. त्यांना छोट्या शेतकरी-केंद्रित, पद्धतशीर उपाययोजना आणि त्यांचा जलदगतीने स्वीकार आवश्यक आहे," असे आयसीएआरचे महासंचालक मांगी लाल जाट यांनी म्हटले आहे..यासाठी अत्याधुनिक विज्ञान, नाविन्यपूर्ण कल्पना आणि शोध ते वितरणापर्यंतच्या भागीदारीमध्ये मोठ्या गुंतवणुकीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील कृषी क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याने, ते ग्लोबल साउथसाठी लघुकृषी नाविन्यपूर्ण केंद्र म्हणून काम करू शकते, असेही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.