Vegetable Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Vegetable Market : नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याच्या आवकेत घट

Chili Market Rate : लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ५,००० ते ७,५०० रुपये तर सरासरी दर ६,००० रुपये मिळाला. उन्हाळ कांद्याची आवक १९ हजार ६८६ क्विंटल झाली.

Team Agrowon

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ मे ते ७ जुलैदरम्यान सप्ताहात वालपापडी-घेवड्याची आवक २,२३९ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ७,५०० ते १०,००० असा तर सरासरी दर ९,००० रुपये राहिला.घेवड्याला प्रतिक्विंटल ८,००० ते १३,००० तर सरासरी दर १०,००० रुपये राहिला.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळाले. हिरवी मिरचीची आवक ८६९ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ५,००० ते ७,५०० रुपये तर सरासरी दर ६,००० रुपये मिळाला. उन्हाळ कांद्याची आवक १९ हजार ६८६ क्विंटल झाली.

त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १,८०० तर सरासरी दर १,२५० रुपये राहिला.लसणाची आवक ४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,७०० ते १० हजार ५०० तर सरासरी दर ७,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ८,६८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,२०० ते १,७५० तर सरासरी दर १,५०० रुपये राहिला.

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ६० ते ३०० तर सरासरी २५०,वांगी ४०० ते ७०० तर सरासरी ६००, फ्लॉवर १५० ते ४०० सरासरी ३०० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १२० ते २१० तर सरासरी १७५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ८०० ते ५०० तर सरासरी दर ७०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २०० ते ५०० तर सरासरी ३५०, गिलके ६०० ते १,१०० तर सरासरी ८००, दोडका ५०० ते १,००० तर सरासरी दर ८२५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले.

फळांमध्ये केळीची आवक १,६३३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते २,००० तर सरासरी दर १,५०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ३,७१० क्विंटल झाली.मृदुला वाणास ३,५५० ते १८,००० तर सरासरी ११,००० रुपये दर मिळाला. आंब्याची आवक २,४९२ क्विंटल झाली. दशहरी आंब्यास प्रतिक्विंटल किमान २,५००,कमाल ६,००० सरासरी ४,००० तर तोतापुरी आंब्याला किमान २,००० कमाल ५,००० तर सरासरी ४,००० दर मिळाला.

भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी किमान कमाल सरासरी

कोथिंबीर ५०० २,९०० १,५००

मेथी १,००० ३,२०० २,०००

शेपू १,००० ३,००० २,१००

कांदापात २,५०० ४,६०० ३,२००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US trade deal: अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका; एसबीआयच्या अहवालात इशारा

Crop Insurance: पीक विम्यात आता बदल अशक्य; तरीही आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक: कोकाटेंची विधानपरिषदेत घोषणा

Kharif Sowing : धाराशिवमध्ये उडीद, कांदा लागवडीला प्राधान्य

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

Onion Cultivation : खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार

SCROLL FOR NEXT