Washim News : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली आहेत. या योजनांमुळे प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजवंदन सोहळ्यात ते बोलत होते. .पंतप्रधान पीकविमा योजनेत दोन लाख ८२ हजार शेतकऱ्यांना १५९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, यापैकी ५५ हजार ९१६ शेतकऱ्यांना ७१ कोटी ३६ लाख रुपये वितरित झाले आहेत.चिया पीक लागवडीत वाशीम जिल्हा देशात अव्वल ठरला असून तीन हजार ६०५ हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा चिया बियाण्याला प्रतिक्विंटल २४ हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे..Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!.‘मनरेगा’ अंतर्गत ८१६ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत २५६ हेक्टरवर लागवड झाली आहे. प्रति थेंब अधिक पीक योजनेत सहा हजार ६९१ शेतकऱ्यांना याचे अनुदान मिळाले. तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत १५ लाभार्थ्यांना तीन कोटी २२ लाख रुपये आणि शेती यांत्रिकीकरणासाठी १८२ लाभार्थ्यांना एक कोटी सात लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे..डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यात आले आहे. (कै.) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत ४१ कोटी ७१ लाख रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले असून, त्यातील सात कोटी ७१ लाख रुपये शेतकरी उत्पादक कंपन्यांना वितरित झाले आहेत. .Agriculture Development: शेतकरी हिताच्या सूचनांना मान्यता कधी?.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमुळे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ३१० कामांना प्रशासकीय मान्यता मिळून एक हजार ६५१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून वाशीम जिल्हा कृषी विकासाच्या दिशेने एक आदर्श ठरत आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांच्या उपलब्धीची माहिती दिली..‘जलतारा’चा गौरवकृषिमंत्र्यांनी भाषणात जलतारा उपक्रमाचा गौरव केला. ते म्हणाले, की जिल्ह्यात राबविण्यात आलेली जलतारा ही लोकचळवळ देशात आदर्श उदाहरण ठरली आहे. भूजल पुनर्भरणाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणाऱ्या २५ गावांना प्रोत्साहनपर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ ४० दिवसात ४० हजार जलतारा शोषखड्डे तयार करून जलसंधारणाच्या बाबतीत केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ (लंडन) मध्ये नोंद केली असून, मिशन आशीर्वादला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.