Us-India Trade Deal Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

India US Trade: अमेरिकेकडून आयातशुल्क स्थगितीला मुदतवाढ

Import Tarrif Delay: अमेरिकेने भारतावरील आयातशुल्क लागू करण्यास दिलेली मुदत आता १ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे भारत-अमेरिका व्यापारी करारासाठी दोन्ही देशांना अधिक वेळ मिळाला आहे.

Team Agrowon

New Delhi News: अमेरिकेने ‘जशास तसे’ धोरणाला अनुसरून अन्य देशांसह भारतावर देखील आयातशुल्क लादण्याची घोषणा केली होती, पण नंतर मात्र त्याला नऊ जुलैपर्यंतची स्थगिती दिली होती. आता याच मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून ती एक ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या मुदत वाढीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापारी करारावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांना अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे. सध्या सरकारी पातळीवर याच व्यापारी कराराच्या अनुषंगाने अमेरिकेसोबत चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आयातशुल्काच्या अनुषंगाने काही निवडक देशांना सोमवारी पत्रे पाठविली असून त्यामध्ये मात्र भारताचा समावेश करण्यात आलेला नाही.

ज्या देशांना हे पत्र पाठविण्यात आले आहे, त्यांच्या उत्पादनांवर येत्या एक ऑगस्टपासून अमेरिकेत आयातशुल्क आकारण्यात येईल. ट्रम्प यांनी ज्या देशांना हे पत्र पाठविले आहे त्यांच्यात बांगलादेश, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका, बोस्निया, हेर्झेगोव्हिना, कंबोडिया, कझाकस्तान, लाओ, सर्बिया आणि ट्युनिशिया यांचा समावेश आहे.

निर्यातदारांची अशीही मते

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अभ्यासक विश्वजित धर म्हणाले, की हा भारतासाठी मोठा दिलासा आहे. काही विशिष्ट गोष्टींवर भारताने ठाम भूमिका घेतली असल्याने हे होऊ शकले. मुंबईतील ‘टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज’चे शरदकुमार सराफ म्हणाले, की ट्रम्प यांच्याबाबतीत आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही. आयातशुल्क लागू करण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी खूपच कमी आहे. भारतीय निर्यातदारांनी वेगळ्या बाजारपेठेचा शोध घेणे गरजेचे आहे.

अमेरिकेकडून एका अर्थाने दिलासाच मिळाला आहे, असे म्हणावे लागेल. यामुळे व्यापारी कराराच्या अनुषंगाने चर्चेसाठी आपल्याला अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकेल. काही संवेदनशील मुद्यांवर दोन्ही देशांना तोडगा काढता येईल. यामुळे भारताला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
अजय सहाय, महासंचालक, फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: दोन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढणार; पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवड्यात पावसाचा अंदाज

Crop Insurance : अहिल्यानगरमध्ये खरीप पीकविम्याला प्रतिसाद कमीच

Turmeric Farming: हळदीमध्ये करपा, कंदकुजीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न

Agriculture Investment: शेतीचा भांडवली खर्च वाढेल

Shibu Soren Dies: झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन

SCROLL FOR NEXT