Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : साखर उत्पादनात महाराष्ट्राची निर्विवाद आघाडी

Sugar Industry : देशातील साखर हंगामाने गती पकडली आहे. ३१ डिसेंबरअखेर देशातील ५११ कारखान्यांनी १२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनांचे साखर उत्पादन केले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशातील साखर हंगामाने गती पकडली आहे. ३१ डिसेंबरअखेर देशातील ५११ कारखान्यांनी १२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनांचे साखर उत्पादन केले आहे.

देशातील सरासरी साखर उतारा ९.१७ टक्के राहिला आहे. थंडीचे प्रमाण वाढेल तसतसा साखर उताऱ्यात वाढ होऊन त्या प्रमाणात साखर उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.

पंधरवड्यापूर्वी महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच्या साखर उत्पादनात अगदी काही हजार टनांचा फरक होता. ३१ डिसेंबरअखेर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या साखर उत्पादनापेक्षा चार लाख टनांनी अधिक गाळप केले आहे.

महाराष्ट्रातील १९५ साखर कारखान्यांनी ४२७ लाख टन ऊस गाळप करून ३८.२० लाख टन साखर उत्पादन करून देश पातळीवर अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यांनी ३५९ लाख टन ऊस गाळप करून ३४.६५ लाख टन नवे साखर उत्पादन केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक राज्यात ७३ कारखान्यांमधून २६४ लाख टन ऊस गाळप झाले. त्यातून २४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

साखर उताऱ्यात महाराष्ट्राची घसरण

सरासरी साखर उताऱ्यात मात्र उत्तर प्रदेशाने ९.६५ टक्के उतारा मिळवून आपला अग्रक्रम राखला आहे. त्या पाठोपाठ कर्नाटकने सरासरी ९.१० टक्के उतारा मिळवून दुसरा क्रमांक राखला. साखर उताऱ्यात तिसऱ्या स्थानावर गुजरात असून तिथे सरासरी साखर उतारा ९ टक्के आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा सरासरी ८.९५ टक्के साखर उतारा नोंदला गेला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ लाख टनांची घट

देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३१ डिसेंबरअखेर साखर उत्पादन ९ लाख टनांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १२१ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. यंदा ११२ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १३२० लाख टन ऊस गाळप झाले होते. यंदा हे प्रमाण १२२३ लाख टनांवर आले आहे.

३०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यातील अपेक्षित थंड हवामान लक्षात घेता साखर उताऱ्यात वाढ होणे अपेक्षित आहे. जेणेकरून हंगामअखेर उत्तर प्रदेशात ११५ लाख टन, महाराष्ट्रात ९० लाख टन, कर्नाटकात ४२ लाख टन, तमिळनाडूत १२ लाख टन, गुजरातमध्ये १० लाख टन व इतर सर्व राज्ये मिळून एकूण ३०५ लाख टन नवे साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे.

केंद्र शासनाने उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर मर्यादा आणल्यामुळे स्थानिक वापरासाठी देशपातळीवर एकूण नव्या साखरेची उपलब्धता ३०५ लाख टन होण्याची अपेक्षा आहे.
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ
हंगामाच्या सुरुवातीला असणाऱ्या अंदाजित २९० लाख टन साखर उत्पादनात जवळपास १५ लाख टनांनी वाढ होणे अपेक्षित असल्याने तसेच हंगाम सुरुवातीची शिल्लक, अपेक्षित स्थानिक खप लक्षात घेता इथेनॉल निर्मितीवरील सध्या लादण्यात आलेली बंधने काही प्रमाणात शिथिल होऊ शकतात. त्यादृष्टीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन संयुक्तपणे केंद्र शासनाकडे याबाबत मागणी करणार आहे.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT