Sugar Production : महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशचा साखर कोटा घटविला

Maharashtra Sugar Quota Update : केंद्राने जानेवारीच्या साखर कोट्याचे वितरण करताना महाराष्ट्राचा साखर कोटा डिसेंबरच्या तुलनेत १० टक्क्यांनी घटविला आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्राने जानेवारीच्या साखर कोट्याचे वितरण करताना महाराष्ट्राचा साखर कोटा डिसेंबरच्या तुलनेत १० टक्क्यांनी घटविला आहे. कर्नाटक वगळता कमी साखर उत्पादन असणाऱ्या गुजरात, राजस्‍थान, तमिळनाडू आदी राज्यांच्या कोट्यात वाढ करण्यात आली आहे.

सध्‍या साखर उत्पादनात महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही राज्यांच्या विक्री कोट्यात जानेवारीत घट करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या कोट्यातही ९ टक्यांची घट करण्यात आली. उत्तर प्रदेशला ७ लाख २२ हजार टन साखरेच्या विक्रीला परवानगी देण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक ४८ टक्क्यांची घट झाली आहे.

Sugar Production
Sugar Production : यंदाच्या ऊस हंगामात साखर उत्पादन घटलं, ९० लाख क्विंटल उत्पादन कमी, ऊस गाळपातही पिछाडी

डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ७ लाख ९९ हजार ४५५ टनांचा कोटा दिला होता. जानेवारीत यामध्ये ८४ हजार १०४ टनांची घट करून हा कोटा ७ लाख १५ हजार ३५१ टनांवर आणण्‍यात आला आहे. कर्नाटकाला मात्र गेल्या महिन्याच्या तुलनेत २२ टक्क्यांनी कोटा वाढवून देण्यात आला. ४ लाख ८७ हजार ४२४ टनांचा कोटा कर्नाटकसाठी देण्यात आला.

सध्या सुमारे २० राज्यांमध्ये साखर उत्पादन सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश व कर्नाटक ही राज्ये साखर उत्‍पादनात आघाडीवर आहेत. केंद्राने साखर कोटा देताना कमी साखर उत्पादन करणाऱ्या राज्यांना अतिरिक्त कोटा दिला आहे. या राज्यातील कारखान्यांना जास्त साखर विक्री करावी, अशा उद्देशाने गेल्या महिन्याच्या तुलनेत साखर कोट्यात अदलाबदल करण्यात आले.

Sugar Production
Sugar Production : केंद्राकडून जानेवारीसाठी २३ लाख टनांचा साखर कोटा

केंद्राचे साखर विक्रीवर लक्ष

गेल्‍या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी असल्याने केंद्र सरकार साखर विक्रीबाबत सातत्याने लक्ष ठेवून आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीचा कोटा १ लाख टनांनी कमी करण्यात आला आहे. साखरेचे दर स्‍थिर ठेवण्यासाठी कारखान्यांच्या साखर विक्रीवर केंद्राचे सातत्याने लक्ष आहे. यामुळेच किरकोळ बाजारात साखरेचे दर नियंत्रित राहत असल्‍याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

सध्या साखरेला मागणी कमी

सध्या साखरेला मागणी कमी आहे. दिवाळीनंतर साखर बाजार काहीसा स्‍थिर झाला आहे. दरात ठरावीक दिवसानंतर क्‍विंटलला १० ते ५० रुपयापर्यंत चढ-उतार होत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com