Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Rate : मंदीतही हळदीचे दर टिकून

यंदाचा हळदीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी साइड मार्केटवर मंदीचे सावट आले होते. त्यामुळे दरात घरसण झाली होती. हळदीला किमान साडेसात हजारांपासून ते कमाल आठ हजारांपर्यंत दर मिळत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः यंदाचा हळदीचा हंगाम (Turmeric Season) अंतिम टप्प्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी साइड मार्केटवर मंदीचे सावट आले होते. त्यामुळे दरात (Turmeric Rate) घरसण झाली होती. हळदीला किमान साडेसात हजारांपासून ते कमाल आठ हजारांपर्यंत दर मिळत आहे. हळदीच्या दरावर मंदीचे सावट असले, तरी दर टिकून आहेत. देशात व्यापारी आणि शेतकऱ्यांकडे ३० लाख पोती शिल्लक असतील, असा अंदाज हळद उद्योगातील (Turmeric Market) जाणकारांनी व्यक्त केला.

देशात दोन महिन्यांपूर्वी सोयाबीन, मका पिकांच्या अर्थात साइड मार्केटवर मंदी आली होती. त्याचा परिणाम हळदीच्या दरावर झाला होता. यामुळे हळदीच्या दरात प्रति क्विंटलला ५०० ते १००० रुपयांनी उतरले होते. या दरम्यान, देशात सुमारे ४० लाख पोती शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे शिल्लक होती. त्यानंतर दिवाळीनंतर मार्केटमध्ये हळदीचे सौद्यास प्रारंभ झाला. त्यामुळे हळद विक्रीसाठी व्यापारी आणि शेतकरी पुढे येत आहेत.

सध्या देशातील प्रमुख बाजारपेठेतील इरोड वगळता अन्य बाजारपेठांतील हळदीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. इरोड मार्केटमध्ये वर्षभर हळदीची विक्री होत असल्याने दररोज सुमारे ५ ते ७ हजार हळदीच्या पोत्यांची विक्री होत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात दररोज २० ते २५ हजार पोत्यांची विक्री होत आहे. बाजारात हळदीच्या मागणीतही काही प्रमाणात घट झाली असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांत १० लाख पोत्यांची विक्री झाल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे. सांगली, निजामाबाद यासह अन्य बाजारपेठांतील हळदीचा हंगाम आटोपला आहे. बाजारपेठेत मंदीचे सावट असले तरी, हळदीचे दर टिकून आहेत. देशात हळद पिकास पोषक वातावरण आहे. सध्या कंद वाढीचा काळ आहे. त्यामुळे करपा, कंदकुज यांसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव कुठेही नाही. त्यामुळे यंदा उत्पादनात वाढ होईल, अशी शक्यता हळद संशोधन केंद्राने व्यक्त केली.

हळदीचे दर प्रति क्विंटलमध्ये

राजापुरी ७५०० ते ८०००

जळगाव ६२०० ते ६५००

नांदेड ६५०० ते ६८००

दोन महिन्यांपासून बाजारपेठेत मंदी आहे. परंतु या काळातही हळदीचे दर टिकून आहेत. यंदा हळदीच्या उत्पादनात १० टक्के घट होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात हंगाम सुरू झाल्यानंतर उत्पादनाची स्थिती समोर येईल.
गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT