
पुणेः कोरोनाकाळात शेतकऱ्यांना चांगली साथ देणाऱ्या हळदीचा (Turmeric Rate) रंग मागील वर्षभरात फिका पडला. मागणी (Turmeric Demand) कमी झाल्याने हळदीचे दर (Rate Of Turmeric) दबावात राहीले. तसेच सध्या मागील हंगामातील साठा (Turmeric Stock) मोठ्या प्रमाणात आहे. याचा परिणाम बाजारावर होत असल्याचे बाजार अभ्यासकांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात हळदीला चांगाल दर मिळाला होता. हळदीच्या दराने १० हजारांचाही टप्पा पार केला होता. कोरोनाकाळात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळदीचे सेवन वाढले होते. हळदीचा थेट वापरही वाढला होता.
दूध आणि पाण्यातून हळद घेण्याचे प्रमाण जास्त होते. वाढलेली मागणी आणि तेजीतील दर पाहता शेतकऱ्यांनी नंतर हळदीची लागवड वाढवली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भारतासह इतर देशांमध्येही हळदीचा वापर झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दीड वर्षापासून हळदीला मागणी कमी झाली. मात्र देशातील लागवड वाढली. यंदाही लागवड मागीलवर्षीच्या तीन लाख हेक्टरवरून साडेतीन लाख हेक्टरवर पोचल्याचे केंद्राने स्पष्टे केले.
केंद्र सरकारच्या मते, मागील हंगामात देशात १३ लाख ३१ हजार टन हळदीचे उत्पादन झाले होते. तर प्रक्रिया उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या मते सध्या मागील हंगामातील अडीच ते तीन लाख टन शिल्लक आहे. त्यामुळे हळदीचे दर दबावात आहेत.
सध्या बाजारातील आवक कमी आहे. मात्र प्रक्रिया उद्योगाकडून उठाव नाही. त्यामुळे हळदीचे दर दबावात आहेत. सध्या हळदीला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ५०० ते ७ हजार रुपये दर मिळतोय. ही दरपातळी पुढील काही महिने कायम राहू शकते, असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.