Tur rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तूर दराची दहा हजारांकडे वाटचाल

Tur Rate : बाजारात कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत असताना दुसरीकडे तुरीच्या दरात सुधारणा अनुभवली जात आहे.

Team Agrowon

Tur Market Update : बाजारात कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत असताना दुसरीकडे तुरीच्या दरात सुधारणा अनुभवली जात आहे. सध्या तुरीच्या दराने साडेनऊ हजारांचा पल्ला गाठला असून येत्या काळात हे दर दहा हजार रुपयांवर पोहोचतील असा अंदाज आहे.

अमरावती बाजार समितीत तुरीची आवक आता मंदावली आहे. बाजार समितीमध्ये तुरीला पहिल्यांदा उच्चांकी ९७०१ रुपयांचा दर मिळाला आहे. तुरीच्या दरात झालेल्या वाढीच्या परिणामी तूर डाळही महागली आहे.

मॉलमध्ये १५० रुपये तर किराणा दुकानात १३५ रुपये किलो असा दर तूर डाळीला मिळत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ८४ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत झालेला सततचा पाऊस आणि सर्वच तालुक्‍यांत सरासरी पार झालेल्या पावसामुळे तुरीवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला.

५० टक्‍के क्षेत्रातील तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या जागच्या जागी वाळल्या. त्यानंतर अतिथंडीचा परिणामही शिल्लक तुरीवर झाला. दवामुळे बहरातील तुरीचे शेंडे जळाले. त्यामुळे सरासरी उत्पादन घटले. परिणामी बाजारात तुरीची आवक घटल्याचे चित्र आहे.

परिणामी किराणा दुकानांसोबतच मॉलमध्ये तूर डाळीचे दर तेजीत आले आहेत. तूरडाळ महाग होत असल्याने साठेबाजीवर नियंत्रणाचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. प्रत्येक स्तरावर लिमिट ठरवून देण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, तूरडाळ १३५ ते १५० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यासोबतच मूग डाळ ११५ ते १२०, तर हरभरा डाळीला ७० ते ८० रुपये किलोचा दर मिळत आहे

मागील सात दिवसांतील तुरीचे दर (रुपयांत)

१२ मे ः ८२५०-८७६०

१३ मे ः ८३००-८८६७

१५ मे ः ८७५०-७२५०

१६ मे ः ८५००-९०३०

१७ मे ः ८५००-९२५३

१८ मे ः ८८५०-९२५३

१९ मे ः ९१००-९७०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT